आंबेडकरांनी हिसका दाखवताच पटोलेंना दणका; काँग्रेसने अधिकारच काढून घेतले…
Nana Patole News : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या होणाऱ्या बैठकीबाबत महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांची सही होती. त्यावरुन प्रकाश आंबेडकरांनी पटोलेंना अधिकार नसल्याचं म्हणत हिसकाच दाखवला आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसकडून नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पक्षात कोणाला घ्यायचं कोणाला नाही, यासंदर्भातील अधिकार काढून घेतल्याचं समोर आलं आहे.
‘मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नाही’; CM एकनाथ शिंदेंनी शब्दच दिला
काँग्रेस पक्षाने कोणासोबत युती करावी, कोणासोबत नाही, याबाबतचे निर्णय नाना पटोले यांनी दिले नसल्याचं पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. या पत्रामध्ये आंबेडकरांनी नाना पटोलेंच्या डोक्यात लोचा झालायं का? असा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केल्याचंही दिसून आलं होतं. आंबेडकरांनी पत्र लिहून महाविकास आघाडीच्या बैठकीचं थेट निमंत्रणच नाकारल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले यांना अधिकार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच यासंदर्भातील अधिकार अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनाच अधिकार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या पत्रामुळे नाना पटोले यांना दणकाच दिला असल्याचं दिसून येत आहे.
इंडिया आघाडीत सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणं सुरु असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर महाविकास आघाडीमध्येही सामिल होण्यास आम्ही इच्छूक असल्याची इच्छा आंबेडकरांनी दर्शवली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून कोणतंही प्रत्युत्तर न आल्याने आंबेडकरांनी थेट 12-12जागांचा फॉर्मूलाच महाविकास आघाडीसमोर ठेवला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात; डोक्याला मार लागल्याने जखमी…
आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलं होतं?
येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाच्या मुद्द्यावरुन बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलं. या निमंत्रणावरुन आंबेडकर चांगलेच भडकले आहेत. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या जागावाटपाबद्दलच्या बैठकीच निमंत्रण देण्याचा अधिकार नाना पटोले यांना कोणी दिला? असा थेट सवाल आंबेडकरांनी केलायं. असं वाटतयं की तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनाशी खेळ खेळताहेत, तुमच्या डोक्यात लोचा झाला असल्याची खोचक टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती.