मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कॉंग्रेस पक्षाबद्दल एक दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) खळबळ निर्माण झाली आहे. आंबेडकर म्हणाले की, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल.

“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर

प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना, त्यादरम्यानच त्यांनी आता एक खळबळ जनक दावा केला आहे. ते म्हणाले की, यावेळी मुस्लिमांनी भावनांसोबत डोक्याने विचार करून देखील मतदान करणे गरजेचे आहे. कारण यामुळे महाराष्ट्रातील कमीत कमी 40 जागा भाजपच्या विरोधात जातील.

‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री! लवकरच करणार पक्ष स्थापनेची घोषणा

मुस्लिमांनी कोणत्याही एका पक्षाच्या मागे जाऊ नका. काँग्रेसने मुस्लिमांसाठी जे काही केलं. त्यावरून तुम्ही यावेळी काँग्रेसला मतदान करणार असाल तर मुस्लिमांनी तसं करू नये. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल.

आम्ही महाविकास आघाडीबरोबर चर्चा करणार

महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीचं निमंत्रण आम्हाला आलं आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आमचे मुद्दे आम्ही त्या बैठकीत मांडणार आहोत. त्यांचं 35 जागांवर समझोता झाला असं वक्तव्य मध्यंतरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्याचीही माहिती आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube