पुणे शिक्षक जागेवरून महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादी, शिवसेनेचा दावा कायम!
Pune Teachers Constituency Election: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.
Pune Teachers Constituency Election: पुणे : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघावरुन घोडे अडले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांनी दावा केला आहे. या जागेवरून पुन्हा एकदा वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
200 कोटींची ऑफर; ‘गोकुळ घशात घालण्याचा प्रयत्न’, सतेज पाटलांचा हल्लाबोल!
पुणे आणि नागपूर पदवीधर भाजपकडे तर संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे. मात्र, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा असल्याने नेमकं कोण ही जागा लढवणार याबाबतची निश्चिती नाही. त्यामुळे पुण्याची जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मान्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, हवामान खात्याची माहिती!
शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे, बी. पी. रोंगे, तसेच माजी आमदार दत्तात्रय सावंत हेही मैदानात आहेत. शिवसेनेकडून सचिन सानप आणि मंगेश चिवटे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून पदवीधरसाठी आग्रह धरला आहे. पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच लढावी यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन मागणी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांच्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, महायुतीमध्ये जागेवरुन रस्सीखेच सुरू असल्यामुळे माने यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
धस-आजबे संघर्ष पुन्हा पेटला, प्राजक्ता धसांचा थेट पलटवार; ‘तुमचे सहकारी कराड…’
महाविकास आघाडीकडून उच्चशिक्षित उमेदवार म्हणून हर्षदा देशमुख-जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजप सुद्धा उच्चशिक्षित उमेदवार देऊ शकते. भाजप वेळेवर एखादे नवीन नावही समोर आणू शकते अशी चर्चा आहे.
दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची यादी (candidates list) जाहीर केली. काँग्रेसने परस्पर ३ उमेदवारांची नावे जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील इतर पक्षांची नाराजी आहे. मित्र पक्षांना विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? असा सवाल मित्र पक्षांनी उपस्थित केला आहे. आज (शनिवारी, ता ३) दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची दुसरी बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.