…याच कायद्यानुसार मोदी, शाहांना तुरुंगात जाव लागणार; राऊतांचा थेट प्रहार
Interview with Sanjay Raut : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी होलताना हा दावा केला आहे. तसंच, त्यांनी भाजपसह मोदी आणि राज्यातील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. आज ईडी, सीबीआय यांच्यासारख्या संस्थांचा वापर करून हे लोक विरोधकाना तुरुंगात डांबत आहेत. याच संस्था मोदी आणि शाहांची वाट पाहत आहेत. सत्ताबदल झाल्यानंतर हे लोकही तुरुंगात असतील असंही राऊत म्हणाले आहेत.
हे कायदे तुम्हालाही लागू होणार
जो खेळ या लोकांनी सुरू केलाय तो खेळ यांच्यावरच उलटू शकतो. कारण हा देश काही कोणाच्या मालकीचा देश नाही. या देशात कधीही सत्ताबदल होईल आणि तुम्ही जे गुन्हे करुन ठेवले आहेत त्यासाठी तुम्हाला कधी तुरुंगात जावं लागेल हे सांगता येत नाही असंही राऊत यावेळी म्हणाले. आज जे कायदे वापरून तुम्ही विरोधकांना लक्ष करत आहात ते कायदे उद्या तुम्हालाही लागू होतील असा इशाराच राऊत यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
चेहरा काळा ठिक्कार पडला
राऊत यांनी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांना आता आपण निवडून येतोल याबाबत खात्री नाही. त्यांचा चेहरा आपण पाहू शकता तो काळा ठिक्कार पडलाय. तसंच, अमित शहांचा चेहरा बघा त्यांची दाढी जळाल्यासारखी वाटते असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला आहे. घाबरलेला माणूस थोडाफार आत्मविश्वास दाखवतो. तसा थोडा आत्मविश्वास भाजप दाखवत आहे असं म्हणत राऊतांनी भाजपचा आत्मविश्वास ढळला आहे असा दावा केला.
मोदींनी खोटा आत्मविश्वास निर्माण केला
महाराष्ट्रात नाही तर देशात कुणीही सांगेल शिवसेना कुणाची आहे. परंतु, एकनाथ शिंदे म्हणतात आमचीच शिवसेना खरी आहे. मात्र, शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिंदे गोधडीत होते असा टोला राऊतांनी लगावला. पण आज हा खोटारडा माणूस म्हणतो शिवसेना आमचीच आहे. तर हा खोटं बोलण्याचा आत्मविश्वास कुठून आला तर गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा खोटा आत्मविश्वास निर्माण केला असा थेट प्रहार राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.