‘लाडक्या बहिणीं’साठी काय पण! शिंदे गटाच्या नेत्याचा अजब सल्ला, म्हणाले, वेगळं व्हा…
Arjun Khotkar : सरकारी योजनांच्या लाभासाठी महिलांनी चालाखी दाखवून सासू-सूनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं, असा अजब सल्ला शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिलायं. दरम्यान, सरकारकडून महिलांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आलायं. या पार्श्वभूमीवर सर्वच महिलांना लाभ मिळण्यासाठी अर्जून खोतकर यांनी महिलांना आवाहन केलंय.
जडेजाला पर्याय! हेड कोच गौतम गंभीर अन् सूर्याने शोधला नवा स्टार
पुढे बोलताना खोतकर म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अनेक योजनांचा धडाका सुरु केलायं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1500 महिन्याला तर मोफत गॅस सिलिंडरही मिळणार आहेत. या योजना घरातल्या दोनच महिलांना लागू होणार होत्या, मात्र असं केल्याने घरातल्या सासू सूनांमध्ये भांडणं लागतील त्यामुळे घरातल्या सर्वच महिलांना योजनांचा लाभ देण्याबाबतची विनंती मुख्यमंत्री शिंदेंना केली असल्याचं खोतकरांनी सांगितलंय.
आता महिलांनी थोडी हुशारी दाखवायला हवी, एका कुटुंबासाठी तीन गॅस सिलिंडर घोषित केले आहेत. तुम्ही माझं ऐकून थोडी चालाखी दाखवा, सासू सूना वेगळ्या झाल्यात असं दाखवून सर्वच योजनांचा लाभ घ्या, म्हणजे एका घरात तीन सुना असतील आणि एक सासू असेल तर प्रत्येकाला तीन हिशोबाने 12 सिलिंडर मिळतील, आणि प्रत्येक महिलेला 1500 रुपये मिळतील असं खोतकरांनी स्पष्ट केलंय.
धक्कादायक! ‘पतीने इंजेक्शन देऊन साखळदंडाने बांधलं’, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडली महिला
दरम्यान, राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पात्रतेमध्ये सरकारकडून सुरुवातीपासूनच अनेक बदल करण्यात येत आहेत. घोषणा केली त्यावेळी सरकारने महिलांचं उत्पन्न, चारचाकी, शेती अशी अनेक बंधने घालण्यात आली होती. आता सरकाकडून ही सर्व बंधने काढण्यात आली असून महिलांना सुलभ पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल या उद्देशाने योजनेच्या पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. तसेच विरोधकांकडून टीका होताच सरकारकडून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार युवकांसाठीही योजनेची घोषणा करण्यात आलीयं.
शिंदे गटाचे नेते खोतकर यांनी महिलांना असा अजब सल्ला दिल्यानंतर महिलांमध्ये विविध चर्चांना उधाण येत आहे. राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये तीन सुना आणि सासू असं एकत्रित कुटुंब होतं. सरकारने योजनेची घोषणा केल्यानंतर एका कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. मात्र, खोतकर यांच्या दाव्यामुळे आता एका कुटुंबातील तीन सुनांसह सासूलाही योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं बोललं जात आहे.