‘…तर महाराष्ट्र जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही’; शिंदे गटाच्या प्रवक्त्याची सडकून टीका

‘…तर महाराष्ट्र जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही’; शिंदे गटाच्या प्रवक्त्याची सडकून टीका

Jyoti Waghmare : सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, महाराष्ट्र तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदे तुमचाच मुलगा आहे हे सिद्ध करा, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या या विधानावर ज्योती वाघमारे आक्रमक झाल्या आहेत. यावेळी बोलताना वाघमारे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख संजय डाऊट असा केला आहे.

टीव्ही लावला की नको त्याचं तोंड पाहावं लागतं, मंत्री विखेंचा संजय राऊतांवर घणाघात…

ज्योती वाघमारे म्हणाल्या, अपात्र आमदार प्रकरणावर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालानंतर संजय डाऊट पिसाळले आहेत. त्यांच मानसिक संतुलन बिघडलं आहे. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा आहे हे सिद्ध करा असं विधान ते करीत आहेत पण संजय डाऊट हा महाराष्ट्र शिवराय, जिजाऊंचा आहे, सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी बेताल वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. नाहीतर महाराष्ट्र जोड्याने मारल्याशिवाय राहणार नसल्याचं ज्योती वाघमारे म्हणाल्या आहेत.

Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर

काय म्हणाले होते संजय राऊत?
घराणेशाहीचा अंत झाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मग श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का? त्याला पद देताना माझा मुलगा आहे, त्याला पद द्या, असे सांगून पद घेतले होते. घराणेशाहीवर बोलण्याआधी तुम्ही श्रीकांत शिंदेवर बोला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती.

MLAs disqualification : आजचा निकाल म्हणजे राजकीय निवाडाच; शरद पवारांची जळजळीत टीका

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल जाहीर केला. या निकालामध्ये राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाचीच असल्याचं नमूद केलं आहे. तर शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाच्या आमदारांना नार्वेकरांनी पात्र ठरवलं आहे. तसेच शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांनाच वैध ठरवलं असल्याने ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

ठाकरे गटाच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला होता. घराणेशाही संपली हा लोकशाहीचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube