रायगडनंतर बुलढाण्याच्या पालकमंत्री पदाच्या वादाला सुरुवात; संजय गायकवाडांचे मोठे विधान
Shivsena MLA Sanjay Gayakwad : विविध वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष आहे, त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावरही आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यावेळी आमदार गायकवाडांनी केला होता.
राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आता जवळपास अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहे. गायकवाड यांना यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आता मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ” काही झाले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही” अशी भूमिका आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे.
“तुम्ही माझी भावकी… सरकारला माझंही तिसरं इंजिन : अजितदादांची केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा
जिल्ह्यात शिवसेनेचे २ आणि भाजपचे ३ आमदार आहेत त्यामुळे १ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळू देणार नसल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. दरम्यान, अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
तटकरेंना मंत्रिपद मिळालं, तुम्हाला कधी? गोगावलेंनी सांगितली पुढची तारीख….
तसेच रायगडच्या पालकमंत्री पदावरुनदेखील जोरदार वाद सुरु आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यास कडाडून विरोध आहे. सध्या शिवसेनेचे उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहे. यानंतर राष्ट्रवादीकडून रायगडचे पालकमंत्रीपद भाजपकडे असावे अशी मागणी करण्यात येते आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येते आहे.