उद्या कुठेही निवडणूक झाली तरी भाजपला जड जाईल; उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

उद्या कुठेही निवडणूक झाली तरी भाजपला जड जाईल; उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

Uddhav Thackeray Challenges BJP : वक्फ संशोधन विधेयक काल लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill) करण्यात आले. आज राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. या विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीच संबंध नाही. अमित शाह, किरेन रिजिजू यांनीही मुस्लिमांचं लांगूलचालन केलं आहे. त्यामुळे आता हिंदूंचे डोळे उघडले आहेत. हिंदू आता जागा झाला आहे. हे लोक आपला वापर करुन घेत असल्याचे त्याच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता उद्या कुठे जरी निवडणूक झाली तरी भाजपला जडच जाणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

भाजपला धन्यवाद त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय आणला

भाजपला मी धन्यवाद देईन. त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय घेतला. आता भाजपाचं खरं रुप समोर आलं आहे. हिंदूंचे डोळे उघडले आहेत. जेडीयू आणि टिडीपीनेही सांगितलं की आम्ही मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात कुणालाही जाऊ देणार नाही. त्यावर मात्र अमित शहापासून कुणाचीही काही बोलण्याची हिंमत झाली नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ठाकरे पुढे म्हणाले, आमचा विरोध ढोंग आणि नौटंकीला आहे. या बिलात काही चांगल्या गोष्टी सु्द्धा आहेत. आमच्या सूचना जर सरकारने विचारात घेतल्या असत्या तर चांगलं झालं असतं. सबका साथ असं म्हणता ना मग सगळ्यांना सोबत का घेतलं नाही असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. एनडीएमध्ये असतो तरी देखील आम्ही वक्फ विधेयकाला विरोधच केला असता. कारण आम्ही अशाच भूमिका घेत आलो आहोत.

मी अंंधभक्त नाही, काँग्रेसचाही दबाव नाही

आता इंडिया आघाडीत असताना काँग्रेसचा आमच्यावर आजिबात दबाव नाही. जे वाटतं, पटतं ते करतो. मी अंधभक्त नाही. तुम्हाला वक्फमध्ये काय सुधारणा करायच्या आहेत त्या करा. पण उद्या तुम्ही आमच्या मंदिरांवरही याल. तुम्ही हिंदूंचे राखणदार नाहीत का असा सवाल ठाकरेंनी केला. आम्हाला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्यांचा विरोधही केला. नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर या सरकारने लोकलच्या दरात वाढ केली होती. या निर्णयाचा आम्ही विरोध केला होता असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Video : आता हिंदू जागे झालेत; ‘वक्फ’ विधेयकाबाबत आभार मानत ठाकरेंनी सांगितली भाजपची चाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube