विखेंचा पराभव अन् लंकेंचा विजय नगर जिल्ह्यात विधानसभेला कोणती गणितं बदलवणार?

विखेंचा पराभव अन् लंकेंचा विजय नगर जिल्ह्यात विधानसभेला कोणती गणितं बदलवणार?

Sujay Vikhes Defeat will changed Vidhansabha calculations Ahmednagar : लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर ( Ahmednagar ) दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके विरुद्ध विखे. यामध्ये शरद पवार यांचं विखेंच्या ( Sujay Vikhe ) पराभवाचं कित्येक वर्षांपासूनच स्वप्न पुर्ण झालं आहे. त्यानंतर त्यांनी आता नगरवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या लढतीत झालेला विखेंचा पराभव आणि लंकेचा विजय यामुळे जिल्ह्यातील विधानसभा ( Vidhansabha ) मतदारसंघाच्या गणितावर काय परिणाम होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शरद पवारांचं स्वप्न साकार…

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये निलेश लंके यांच्या रूपाने शरद पवार यांना खासदार मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनी नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कारण लंकेच्या विजयामुळे 1991 चं शरद पवार यांचं विखे कुटुंबाचा पराभव करण्याचे स्वप्न या निवडणुकीत पूर्ण झालं आहे. 1991 मध्ये पवार यांनी बाळासाहेब विखें विरोधात गडाखांना निवडून आणलं होतं. मात्र त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. उच्च न्यायालयाने पवारांवरती ताशेरे ओढले. मात्र सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर पवारांना दिलासा देखील मिळाला होता. तेव्हापासून विखे कुटुंबाचा पराभव करण्याचं शरद पवारांचं स्वप्न आता लंकेच्या रूपाने पूर्ण झालं आहे. तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाचा वर्धापन दिन देखील अहमदनगरमध्ये घेतला.

विखेंच्या पराभवामुळे महायुती कोणता डाव टाकणार?

अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेत विधानसभेचे 5 मतदार संघ आहेत. त्यात विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरलेला पारनेर मतदारसंघ विशेष चर्चेत असणार आहे. त्यात शरद पवारांकडून या मतदारसंघात लंकेंच्या पत्नी राणी लंके यांना मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महायुती येथे लंकेंचे कट्टर विरोधक असणाऱ्या दोन्ही विजय औटींपैकी कोणाला संधी देते हे पाहवं लागणार आहे. यात एक विजय औटी हे माजी आमदार तर एक पारनेरचे नगराध्यक्ष आहेत.

मोठी बातमी! कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार, काँग्रेसच्या उमेदवाराला दिला पाठिंबा

दुसरा मतदारसंघ श्रीगोंदा येथे महायुतीचे आणि भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्याने त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते यांना उतरवण्याची शक्यता आहे. तर मविआ आणि शरद पवार यांचा पक्ष येथे राहुल जगतापांना उतरवेल असं बोलल जात आहे. कारण जगतापांनी लंकेंना श्रीगोंद्यात लीड मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. मात्र या मतदारसंघात चौरंगी लढत झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण येथे विक्रम पाचपुते राहुल जगताप यांच्यासह शिवसेनेचे साजन पाचपुते आणि अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे देखील विधानसभेसाठी सज्ज आहेत. त्यामुळे येथे युती आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mirzapur 3: जंगल मे भौकाल! ‘मिर्झापूर 3’ चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

तर तिकडे कर्जत जामखेडमध्ये गेल्यावेळी प्रमाणे रोहित पवार विरूद्ध राम शिंदे अशी थेट लढतीची शक्यता आहे. राम शिंदेंना 2019 च्या पराभवाचा वचपा काढायचा आहे. तसेच विखेंकडून येथे दुसरा उमेदवार सुचवण्याची देखील शक्यता आहे. तसेच नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप विद्यमान आमदार यांना शहरातील शरद पवार यांच्या वर्चस्वाचा फटका बसु शकतो. त्यात शरद पवारांकडून अभिषेक कळमकर यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. तसेच या दरम्यान रोहित पवारांच्या एका दाव्याने चर्चांना उधान आले आहे. ते म्हणजे नगरमधील काही लोक शरद पवारांच्या संपर्कात आहेत.

आजच्या स्वार्थी जगात आपली मैत्री; रक्षा खडसेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच प्रितम मुंडेंची भावनिक पोस्ट

त्यानंतर शेवगाव-पाथर्डीमध्ये देखील लंकेंच्या विजयाची पायमुळ रोवली गेली होती. येथे प्रतापराव ढाकणे यांनी लंकेंसाठी कंबर कसली होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर येथील घुले यांचा मोठा गट आहे या लोकसभेत तो नेमका कोणाच्या बाजूने होता. हे स्पष्ट नव्हतं त्यामुळे हा गट विधानसभेत कोणाकडे झुकतो. यावर देखील येथील गणित अवलंबून आहे. तसेच आणखी एक चर्चा म्हणजे या मतदारसंघातून महायुती आणि भाजप बीड लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना उतरवू शकतो. कारण त्यांचं पुर्नवसन करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित आहे. कारण येथे त्यांना मानणारा आणि पाठींबा देणारा मोठा वर्ग येथे आहे.

तर राहुरीमध्ये शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी देखील लोकसभेत विखेंना रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. तर येथे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विधानसभेसाठी तयारीत आहेत. पण विखेंना राहुरीत मताधिक्य न मिळाल्याने त्यांची चिंता वाढलेली आहे. मात्र विखे या निवडणुकीत पारनेर, राहुरी आणि श्रीगोंदा येथे त्याच्या पराभवाचा वचपा काढण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. त्याचा परिणाम देखील विधानसभेत पाहायला मिळेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज