ठाण्यात मतदारांचा महायुतीला कौल; जिल्ह्यातील 18 जागांपैकी 16 जागांवर महायुतीचाच गुलाल

कThane Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले (Assembly Election Result 2024) होते. आतापासून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि हे कळणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा राजा कोण होणार? राज्यातील प्रत्येक जागा महत्त्वाची असली तरी त्यापैकी एक म्हणजे ठाणे (Thane) विधानसभेची जागा. ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ठाणे शहराच्या जागेवर भाजप, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत आहे. भाजपने ठाणे शहरातून संजय केळकर यांना तिसरी संधी दिली आहे. त्यांच्यासमोर मनसेचे अविनाश जाधव दुसऱ्यांदा निवडणूक लढले, तर उद्धव सेनेने राजन बाबुराव विचारे यांना रिंगणात उतरवले आहे
‘बंटेंगे तो कटेंगे’ राज्यात चालले नाही, पण…; निकालापूर्वीच भुजबळांचे मोठे विधान…
ठाणे जिल्ह्यात देखील महायुतीची हवा चालली आहे. जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेचा चांगलाच प्रभाव पडला असल्याचं समोर आलंय. त्याचप्रमाणे ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय. ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला केवळ दोनच जागांवर विजय मिळवण्यात यश आलंय. तर महायुतीला मात्र मतदारांनी कौल दिला आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवारांची यादी
विधानसभा मतदारसंघ | विजयी उमेदवाराचे नाव | पक्ष |
---|---|---|
कोपरी पाचपाखडी | एकनाथ शिंदे | शिवसेना (शिंदे गट) |
ठाणे | संजय केळकर | भाजप |
मुंब्रा कळवा | जितेंद्र आव्हाड | शरद पवार गट |
ओवळा माजीवाडा | प्रताप सरनाईक | शिंदे गट |
मीरा भाईंदर | नरेंद्र मेहता | भाजप |
कल्याण ग्रामीण | राजेश मोरे | शिवसेना |
डोंबिवली | रविंद्र चव्हाण | भाजप |
ऐरोली | गणेश नाईक | भाजप |
बेलापूर | मंदा म्हात्रे | भाजप |
कल्याण पूर्व | अतुल भातखळकर | भाजप |
उल्हासनगर | कुमार उत्तमचंद | भाजप |
अंबरनाथ | बालाजी किनीकर | शिवसेना |
मुरबाड | किसन कथोरे | भाजप |
कल्याण पश्चिम | विश्वनाथ भोईर | शिवसेना |
भिवंडी पूर्व | रईझ शेख | |
भिवंडी पश्चिम | अशोक पाटील | शिवसेना |
शहापूर | दौलत दरोडा | अजित पवार गट |
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिंदे गट) |
बातमी अपडेट होत आहे…
आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून