आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाही! उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार प्रहार

आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाही! उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार प्रहार

Uddhav Thackeray campaign Sabha : मी सध्या काहीही बोललो तरी त्याची चर्चा होती. मी माझ्या भाषणाची सुरूवात तमाम हिंदू बांधवांनो असं करत नसून देशभक्त बांधवांनो अशी करतो. परंतु, याबद्दलही आता काहींच्या पोटात दुखत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले, मी हिंदुत्व सोडलं नाही आणि कधी सोडणारही नाही. परंतु, देशभक्त हे हिंदू नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत मग देशभक्त न मानणारे देशद्रोही आहेत का? असा पलटवारही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

 

आम्ही सामना जिंकला

आमच्यावर हिंदुत्व सोडलं असा आरोप करतात. परंतु, आम्ही हिंदुत्व नाही आम्ही भाजपला सोडलं आहे असं म्हणत, आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. तसंच, देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत का? असा थेट प्रहारही ठाकरे यांनी फडणवीसांवर यावेळी केला. पुढच्या सभेला जायचं आहे असं म्हणत आम्ही सामना जिंकला आहेच असं म्हणत विजय आमचाच होतोय असा दावाही उद्धव ठाकेंनी यावेळी केला.

 

अन्यायाविरोधात लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म

भाजप वापरा आणि फेकून द्या या भूमिकेने वागत आहेत. 2014 आणि 2019 ला आम्ही साथ दिली. मात्र, नंतर धोका दिला असं म्हणत उद्धव ठाकेरंनी यावेळी पंतप्रदान नरेंद्रर मोदींवर जोरदार घणाघात केला. तसंच, नकली सेना म्हणून आमच्यावर आरोप केला जात आहे. तसंच, आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार असंही म्हणतात. मात्र, आम्ही विलीन नाही तर जो अन्याय करणार त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला असं म्हणत ठाकरेंनी आम्ही लढणारच असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज