सडलेली पाने झडलीचं पाहिजेत; ठाकरेंची शिंदे गटाच्या नेत्यांवर जहरी टीका

सडलेली पाने झडलीचं पाहिजेत; ठाकरेंची शिंदे गटाच्या नेत्यांवर जहरी टीका

Udhav Thackeray News : निसर्गाच्या नियमानूसार पानगळती असतेच, त्यामुळे सडलेली पाणी झडलीच पाहिजे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये श्रीरामपुरात दाखल झाली आहे. यावेळी आयोजित सभेतून ते बोलत होते.

‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घाला’, नितेश राणेंनी राऊतांना झापले

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीच्या वेशीवर पंतप्रधानांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधूर सोडत आहात. जनतेनं आता हुकूमशाहीच्या व्हायरसपासून दोन हात लांब रहा कारण आता कोरोना नाही पण वेगळा व्हायरस पसरलायं. निर्सगाच्या नियमानूसार पानगळती ही असतेच. त्यामुळे सडलेली पाणी झडलीच पाहिजे, त्याशिवाय नवी पाने येत नाहीत. जसे कोंब फुटावे तसे शिवसैनिक हिरवेगार दिसत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर, राजधानीत महिनाभर जमावबंदी; काय सुरु, काय बंद?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशावरही सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपात प्रवेश केला आहे. अशोक चव्हाणांच्या भाजपपक्ष प्रवेशामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्काच बसला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाणांवर डिलर म्हणून आरोप करीत होते. पण आता त्यांनी डिलरलाच लिडर केलं का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम! पटोलेंना लिहिलेलं पत्र Letsupp च्या हाती!

मोदीजी तुम्ही मोदी गॅरंटीचा दिंडोरा पिटवतात हीच तुमची गॅरंटी आहे का? तुम्ही भाजपात या तुम्हाला मंत्रिपद, मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद, मिळेल, त्यासोबतच ईडीकडून तुम्हाला काही त्रास होणार नाही अशी गॅरंटी मोदी देताहेत पण शेतकऱ्यांना गॅरंटी कोण देणार? कितीही भ्रष्टाचार केला तरीही भाजपात आल्यावर पदं मिळतात ही मोदींची गॅरंटी आहे पण भ्रष्टाचारी भाजपात आला की हा भाजपला धक्का असल्याचा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज