राज्यात काँग्रेसचं सरकार आणायचं, वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे, विशाल पाटलांचं मोठं विधान
Vishal Patil : सांगलीतून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचा मोठा मताधिक्याने पराभव करत विशाल पाटील (Vishal Patil) खासदार झालेत. या विजयाने त्यांचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. नुकतंच त्यांनी एक मोठं विधानं केलं. राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
अंतराळातून घरावर कचरा पडला! NASA वर 80,000 डॉलरचा दावा ठोकला…
मिरजेत आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलतांना विशाल पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आपण भाजपचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीयवादी लोकांना हरवू शकतो हे सांगलीने दाखवून दिले. मिरज शहरातील सर्व समाजाने धैर्याने पुढे येऊन मतदान केलं आहे. मुस्लीम, लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला भरभरून मतदान केल्याचं पाटील म्हणाले.
मायावतींची मोठी घोषणा! पुन्हा आकाश आनंद यांना घोषित केलं उत्तराधिकारी, राष्ट्रीय संजोयक बनवलं
पुढं ते म्हणाले, आता महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेसचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आपल्याला अहोरात्र एक होऊन काम करावं लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघात, तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करून लोकांची कामं करायची आहेत. काँग्रेसचा पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत. आगामी विधानसभेत सांगली जिल्ह्यातून काँग्रेसचे ४-५ आमदार निवडून आणायचे आहेत. सांगलीचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, या शहरात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना ज्या प्रकारे त्रास दिला तो मराठा समाजाला आवडला नाही. त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
तर सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांना फसवण्यात आलं. मिरजेतील जनतेची फसवणूक झाली. हे माणसं विसरलेले नाहीत. त्यामुळे आपसातील मतभेद विसरून पूर्ण ताकदीने एकत्र काम करावे लागेल. विशाल राव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्कीच असणार, असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.