पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना, भरधाव चारचाकीने महिलेला उडवलं

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना, भरधाव चारचाकीने महिलेला उडवलं

Pimpri-Chinchwad car accident : पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील हिट अँड रन प्रकरण ताज असताना आता असाच प्रकार पिंपरी चिंचवड येथील भोसरी या ठिकाणी घडला आहे. एका भरधाव कार चालकाने रस्ता क्रॉस करत असलेल्या महिलेला जोराची धडक दिली. (Pune Accident) त्यामध्ये ती महिला रस्त्याच्या कडेला उडून पडली. येथील भोसरी परिसरात ही घटना घडली. (Accident) दरम्यान ही घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे.

गंभीर जखमी    पुणे अपघात प्रकरण ताजं असतानाच मद्यधुंदचा प्रताप; दोन गाड्यांना उडवून ठोकली होती धूम

एक महिला मुलींसोबत रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात भरधाव कारने त्या रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. ती धडक इतकी भीषण होती की, धडक बसल्यानंतर ती महिला जवळपास 8 ते 10 फूट उंचावर उडाली आणि खाली पडली. यात महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

हिट अँड रन केस

या घटनेबाबत पोलिसांकडून मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित केल जात आहे. कल्याणी नगर हिट अँड रन केस असेल किंवा वारंवार हिंजवडी येथे होणारे अपघात पाहता नागरिकांना रस्त्याने चालणे देखील असुरक्षित वाटत असल्याची चर्चा आहे.

पुणे अपघात

19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कारने एका दुचाकीला जबर धडक दिली होती. त्यात दोघांना मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या वडिल आणि आजोबांना अटक करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज