नाना पटोलेंना मराठा आंदोलकांचा घेराव; पटोले म्हणाले, ‘राज्यात सरकार आलं तर…’
Pune News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आंदोलकांकडून (Maratha Reservation) आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता. आता त्यांनी आपला मोर्चा विरोधकांकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गाडी अडवत त्यांना घेराव घातला होता. जयंत पाटील यांनाही जाब विचारला होता. त्यानंतर आज पुण्यात मराठा आंदोलकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घातला. पुण्यातील काँग्रेस भवन येथे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आंदोलक आले. त्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांना जाब विचारला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली.
या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात होता. या आंदोलनानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणप्रश्नी सावध वक्तव्य दिले. महायुतीवर टीका केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने आलं तर मराठा समाजाला न्याय देऊ असा शब्द दिला. पटोले म्हणाले, महायुती सरकारने समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम केलं आहे. या भांडणात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. भाजप आरक्षण विरोधी आहे.
काल केरळमध्ये आरएसएसची (RSS) बैठक झाली. या बैठतकीत त्यांनी म्हटलं की जनगणना राजकीय नसावी. तसं पाहिलं तर जनगणना राजकीय नसतेच. जनगणनेच्या माध्यमातून आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या तीन गोष्टींचं सर्वेक्षण केलं जातं. या माध्यमातून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम होत असतं असाच उद्देश जनगणनेचा असतो.
आमचं सरकार आल्यास न्याय देऊ
आज महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास हिरावून घेत आहे असं वाटत आहे. अशा पद्धतीचं वातावरण तयार करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न महायुती आणि प्रामुख्याने भाजप करत आहे. आता मी एवढंच सांगतो की राज्यात जर बहुमतानं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर यावर तोडगा काढण्याचं काम करू. मराठा समाजाला न्याय देऊ तसेच आरक्षणात वाढ करून ओबीसी समाजालाही मदत केली जाईल. या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली आहे. हे आमचं वचन आम्ही पूर्ण करू.
Nana Patekar: तिरंगा’ सिनेमातील राजकुमारसोबतच्या कामाबद्दल थेटच सांगितले; म्हणाले, दोन गुंड एकत्र