नराधम दत्तात्रय गाडेचा आणखी एक कारनामा; पोलीस गणवेशात फिरायचा अन्…

Swargate Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल (Swargate Case) तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा पोलीस गणवेशातील (Dattatraya Gade) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दत्तात्रय गाडे हा स्वारगेट आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसाच्या गणवेशात फिरायचा. पोलीस असल्याचे सांगून तरुणींना फसवायचा अशी चर्चा होती. त्याच्या या फोटोची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. परंतु, या सगळ्यातून दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दत्तात्रय गाडे पोलीस गणवेशात फिरायचाय. त्याच्या अंगावरील पोलिसाचा गणवेश पाहून प्रत्येकाला तो पोलीस असल्याचेच वाटायचे. दत्तात्रय गाडे याने पोलिसाच्या वेशातील फोटो काढले असावेत. कारण त्याच्या मोबाइलमध्ये फोटो आढळून आले होते. गाडेला याआधीही पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळी त्याच्या मोबाइलमध्ये असे काही फोटो आहेत ही बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO
दरम्यान, दत्तात्रय गाडेचं कुटुंब मागणी करत आहे की, प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवावी. या घटनेमुळे गावातील लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. घटना घडल्यानंतर दत्ता गाडे घरी आला होता. परंतु तो काही बोलला नाही, असं देखील माध्यमांसमोर दत्ता गाडेच्या भावाने म्हटलं आहे.
स्वारगेट बसस्थानकांत सुरक्षा वाऱ्यावर
पुणे जिल्ह्यातील 14 आगारांतील 42 बसस्थानकांपैकी स्वारगेटसह बहुतांश स्थानकांत सुरक्षाविषयक सुविधांचा प्रचंड अभाव आहे. एसटी महामंडळाने नेमलेल्या समितीच्या सुरक्षाविषयक लेखापरीक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये सुरक्षा अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक यांता समावेश होता.
आत्महत्या करावी वाटतेय; स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या फोनने वसंत मोरेंना अश्रू अनावर