चिरीमिरी गोळा करणारे कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या रडारवर; थेट दाखल होणार खंडणीचा गुन्हा

  • Written By: Published:
चिरीमिरी गोळा करणारे कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या रडारवर; थेट दाखल होणार खंडणीचा गुन्हा

पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हागारांवरच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे वाहतूक पोलिसांना थेट इशारा दिला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहनचालकांकडून तोडपाणी करत चिरीमिरी गोळा करणाऱ्या पुण्यातील वाहतूक पोलिसांवर यापुढे थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली आहे. (Extortion Case-Will Be Filed If Money Taken From Motorists Says Pune CP Amitesh Kumar) 

गुंडांची परेड का घेतली? CP अमितेश कुमार यांनी खरं सांगून टाकलं

चिरीमिरी घेतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल

पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात पार्किंग व्यवस्था हवी तशी नसल्याने अनेक वाहनचालक नो पार्किंगमध्ये वाहने लावतात, अशी वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलली जातात. तर अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस मुख्य चौकात न थांबता आडवळणावर थांबून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेत त्यांना सोडून देतात. अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या सर्वांची दखल घेत अखेर पोलीस आयुक्तांनी चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांवर यापुढे थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले आहे. पोलीस आयुक्तांच्या या इशाऱ्यानंतर चिरीमिरी घेणाऱ्या वाहतूक पोलिसांवर वचक बसेल अशी आशा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Pune Accident : ब्लड रिपोर्टची गरज नाही, आमच्याकडे त्याहून मोठा पुरावा : अमितेश कुमार

पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी कसा असणार प्लॅन

चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात वाहन चालक म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरणार असून, कुणी पोलीस कर्मचारी वाहनचालकांकडून कारवाईच्या नावावर चिरीमिरी घेतात का? याकडे बारकाईने लक्ष ठेवणार आहे. एखादा कर्मचारी चिरीमिरी घेताना आढळून आल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे, अमितेश कुमार यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज