पुणेकरांसाठी पुढील तीन दिवस महत्वाचे; हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट

पुणेकरांसाठी पुढील तीन दिवस महत्वाचे; हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट

Pune Rains : मागील दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर पुण्यात पावसाने (Pune Rains) उघडीप दिली आहे. पुण्यासह सातारा, सांगली, मुंबई, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाने थैमान घातले आहे. आणखीही काही दिवस (Pune Heavy Rains) पावसाचा जोर कायम राहणार आहे. यातच आता पुणेकरांसाठी हवामान विभागाने नवा अलर्ट (IMD Alert) दिला आहे. आज शनिवारी हवामान विभागाने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच 28 ते 30 जुलैसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवसांत पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Rain Alert : पावसाचा पुणे मुंबईला फटका, रेल्वे वाहतूक बंद; ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द

पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्रभर आणि गुरुवारी दिवसभरात मुसळधार पाऊस झाला. मागील 32 वर्षात इतका मोठा पाऊस पुण्यात कधीच झाला नव्हता. पावसाने धरणे भरली. रस्ते पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात पाणी शिरले. इतकेच नाही तर धरणातून पाणी नदीत सोडले गेले. नद्या ओव्हर फ्लो झाल्याने हे पाणी शहरात आले. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. या पाण्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहेत. असे असले तरी पावसाची भीती कायम आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुणेकरांची काळजी वाढवणारा अलर्ट दिला आहे. आज पुण्यात पावसाचा ऑरेंज तर 28 ते 30 जुलैसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या दिवसात पुणे शहर आणि घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे, नाशिकच्या पावसाचा नगरलाही धोका! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बुधवारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मोहोळांसमोर नागरिकांचा संताप 

दरम्यान, पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोरच आपल्या व्यथा मांडल्या. तसंच प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. यानंतर माध्यमांशी बोलताना लोकांना झालेला त्रास पाहता त्यांचा रोष सहाजिक आहे. त्यांना त्रास झाला आहे. सूचना न देता मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला असल्याचं मोहोळ यांनी म्हणाले. सध्या सर्व यंत्रणा काम करत आहेत. लवकरात लवकर लोकांना मदत कशी करता येईल, लोकांना सोयी सुविधा पुरवण्याचा काम कसं करता येईल, हे पाहणं सध्या सुरू आहे असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube