निकालाला काही तास शिल्लक असताना उत्साह शिगेला, कार्यकर्त्यांनी लावले मोहोळांच्या विजयाचे बॅनर…

निकालाला काही तास शिल्लक असताना उत्साह शिगेला, कार्यकर्त्यांनी लावले मोहोळांच्या विजयाचे बॅनर…

पुणे : लोकसभेच्या निकालाला (Lok Sabha Election Result 2024) अवघे काही तासच उरले आहेत. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला आहे. आपला नेताच खासदार होणार, असा आत्मविश्वास पुणे शहरातील महायुती (Mahayiti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांकडून बॅनर, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

Savi Box Office: दिव्या खोसलाचा ‘सावी’ तिसऱ्या दिवशीही फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी 

महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यामध्ये पुणे लोकसभेत चुरस पाहायला मिळाली. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकालाच्या काही तास आधीपर्यंत पुण्याचा खासदार कोण होणार? याबाबत चर्चा आणि अनेक अंदाज बांधले जात आहेत. परंतु पुण्याचा खासदार कोण असणार हे उद्याच कळणार आहे.

लोकसभेच्या निकालावर चीनची देखील नजर, जिनपिंग म्हणाले, ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…’ 

शनिवारी काही वृत्तवाहिन्या आणि नामांकित माध्यम संस्थांनी एक्झिट पोल केले. यामध्ये बहुतांश संस्थानी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हेच विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र तरी देखील पुण्याचा खासदार मीच होणार, असा विश्वास धंगेकरांसह कॉंग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी तर शहरात खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल मोहोळ यांचे अभिनंदन देखील केले आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील सोशल मीडियावर काय म्हणतात पुणेकर, निवडून येणार धंगेकर, असा सूर आवळला आहे. उद्या काय निकाल यायचा तो येईलच. मात्र दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांचं टेन्शन वाढवत आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडी कडून रवींद्र धंगेकर आणि वंचित कडून वसंत मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये वसंत मोरे हे किती मतं घेणार यावरच फक्त चर्चा होते. विजय त्यांच्यापासून कोसो दूर असल्याचं अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे मोहोळ आणि धंगेकर यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळेल. मात्र बाजी मोहोळ मारतील, असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत पुण्याचा खासदार कोण असेल हे स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज