“माझी नातवंडं टाहो फोडून रडताहेत, तिघांनी शब्द दिला पण..”, शिवतारेंचा पुन्हा हल्लाबोल

“माझी नातवंडं टाहो फोडून रडताहेत, तिघांनी शब्द दिला पण..”, शिवतारेंचा पुन्हा हल्लाबोल

Vijay Shivtare : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज चेहरे नाहीत. याचं कारण म्हणजे तिन्ही पक्षांनी माजी मंत्र्यांचा पत्ता कट केला आहे. तर काही जण इच्छुक असतानाही त्यांना संधी मिळाली नाही. यातीलच एक आमदार विजय शिवतारे. विजय बापूंनाही (Vijay Shivtare) यंदा मंत्रि‍पदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे शिवतारे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी संतप्त शब्दांत माध्यमांसमोर बोलून दाखवली. शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, शिवतारे संतापले

मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद मिळेल असे शिवतारेंना वाटत होतं. परंतु, त्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे शिवतारे प्रचंड नाराज झाले. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा शिवतारे नाराजी बोलून दाखवत आहेत. कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत आता मंत्रिपद दिलं तरी मला नको असे शिवतारे म्हणाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार होते.

शिवतारे म्हणाले, ज्यावेळी माझे मंत्रिपद नाकारले त्यावेळी मला प्रचंड राग आला होता. माझ्या मंत्रि‍पदाची शेवटच्या क्षणापर्यंत माझे कार्यकर्ते वाट पाहत होते. मात्र शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझं नाव आलं नाही. या गोष्टीचा मला प्रचंड राग आला. आता माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत. विजय शिवतारे निवडून येऊ नये म्हणून काही जणांनी निर्लज्जासारखे काम केलं. मला तिघांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला होता पण तो पूर्ण झाला नाही असे आमदार विजय शिवतारे म्हणाले.

विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

मला मंत्रिपद देण्याबाबत तिघा नेत्यांनी शब्द दिला होता. विधानसभेला काहीच अडचण येणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आतापर्यंत आमची दुश्मनी पाहिली आता दोस्ती पाहा असे ते स्वतःच बोलले होते असेही आमदार शिवतारे यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यात त्यांनी तीन नेत्यांचे नाव घेणे टाळले मात्र हे तीन नेते कोण आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube