संघर्ष टोकाला ! ‘दादागिरी’चा उद्योग करणाऱ्या ‘मलिदा’ गँगेनेही लक्षात ठेवावे; रोहित पवारांचा थेट इशारा

  • Written By: Published:
संघर्ष टोकाला ! ‘दादागिरी’चा उद्योग करणाऱ्या ‘मलिदा’ गँगेनेही लक्षात ठेवावे; रोहित पवारांचा थेट इशारा

Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता स्थानिक पातळीवर एकमेंकांच्या जिरवा-जिरवीचे राजकारण सुरू झाल्याचे आता रोहित पवारांच्या (Rohit Pawar) एक ट्वीटमधील आरोपांवरून वाटत आहे.

Ritesh Deshmukh : “काका नेहमीच पाठिशी उभे राहिले, काका-पुतण्याचं नातं”… रितेशचं वक्तव्य चर्चेत

रोहित पवारांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवरून आज एक पोस्ट केली आहे. अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा_गँग करतेय, असा आरोप रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1759198467803467779?s=20

आजवर कधी असं घडलं नाही. पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँग नेही लक्षात ठेवावं, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

PM Modi : “काँग्रेसअंतर्गत कलह, खोटे आरोप करणे हाच त्यांचा अजेंडा”; PM मोदींचा घणाघात


लोकसभेत नणंद-भावजय आमने-सामने येण्यावरून संघर्ष

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी तशी रणनिती आखल्याचे आता दिसून येऊ लागले आहे. कारण अजित पवार हे आता सुप्रिया सुळे यांच्यावर थेट राजकीय टीका-टिप्पणी करत आहेत. तसेच दोन्ही गटाकडून काही भावनिक आवाहने सुरू झाली आहेत. तसेच सुनेत्रा पवार यांचा प्रचाररथ मतदारसंघात फिरू लागले आहेत. सुनेत्रा पवार ही राजकीय भेटीगाठी घेऊन राजकीय तयारी करत आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेत यंदा नणंद-भावजय यांच्यात लढत होऊन पवारांच्या घरात टोकाचे राजकीय संघर्ष होणार हे आता स्पष्ट होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube