अजित पवारांचा ‘एकला चलो’चा मोठा डाव; पुण्यात वेगळ लढण्याच्या निर्णयाने काय होणार?
राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. (Pune) 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेसाठीचं महायुतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढणार आहेत. या परिस्थितीवर लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी भाष्य केलं आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी वेगळे लढणार यामधून काय साध्य झालं? या प्रश्नावर सांगताना, भाजपला आपले जे उमेदवार आहेत त्यांना संधी देता येणार आहे. त्यामुळे भाजपला आता आपल्या सर्व इच्छुकांचा विचार करता येणार आहे. त्याचबरोबर, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळ लढल्याने जे मातब्बर उमेदवार आहेत ते पक्षातून बाहेर जाणार नाहीत, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार नाही याची काळजी भाजप आणि अजित पवार यांनी घेतली आहे.
आता दोन्ही राष्ट्रवादी पडद्यामागून एकत्र येणार का? हे पाहण महत्वाचं आहे. जर अजित पवार भाजपसोबत यावेळी गेले असते तर त्यांचा पक्ष संपला असता असा थेट दावा यामध्ये करण्यात आला आहे. परंतु, स्वतंत्र निवडणूक लढल्याने ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केलं आहे त्यांना संधी देता येते. त्यातूनच पक्ष वाढतो. अजित पवार हेही वेगळ लढू इच्छित होते. अखेर ते झाल्याने अजित पवारांनी पक्षाची अडचण होण्याचा धोका टाळला आहे.
त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचीही मदत घेऊ शकतात ते पडद्याआडून होईल. सिंधुदूर्ग येथे भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून राणे बंधू विरोधात गेल्याचं दिसलं. तसं चित्र पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिसू शकतं. परंतु, सध्यातरी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरं काही घडलंच तर येणाऱ्या काळात पाहयला मिळणार आहे.
