मुरलीधर मोहोळांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी; खडसे, जाधवांनाही फोन

मुरलीधर मोहोळांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी; खडसे, जाधवांनाही फोन

Muralidhar Mohol, Raksha Khadase will be minister in Modi Cabinet : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये राज्यातील 5 जणांना फोन आलेले आहेत. त्यामध्ये पुण्याच्या मुरलीधर मोहोळांसह ( Muralidhar Mohol ) रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची देखील केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे.

T20 World Cup मध्ये आज IND vs PAK; पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यावर पावसाचं सावट

राज्यातील गेल्या दोन मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे नितीन गडकरी, पियुष गोयल, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले या नेत्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये राज्यातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगली होती. त्यांना मात्र अद्याप कोणताही फोन आलेला नाही त्यामुळे अजित पवार हे अद्याप देखील मंत्रीपदासाठी वेटिंग वर असल्याचा दिसत आहे.

PM Modi Oath Ceremony : आठ हजार विशेष अतिथी, स्वादिष्ट मेजवानी… असा पार पडणार मोदींचा शपथविधी

मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांनी याआधी पुण्याचे महापौर पद भूषवलेलं आहे त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी पक्षाकडून देण्यात आली होती. या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने धंगेकरांच्या रूपाने तगडा उमेदवार पुणे लोकसभेसाठी दिला होता मात्र मोहोळ यांनी सुमारे सव्वा लाखाचा मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा धुवा उडवला होता.

कसं आहे सोहळ्याचं आयोजन?

शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिथींसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने समारंभाच्या तयारीची एक चित्रफीत शनिवारी प्रसिद्ध केली. या समारंभासाठी मोठ्या संख्येने खुर्च्या मांडल्या आहेत. त्या पांढऱ्या कपड्याने झाकलेल्या आहेत. समारंभासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला आहे. आज रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे.

त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर स्वादिष्ट अशा मेजवानीच आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाच्या स्वयंपाकघरातील खास पदार्थ समारंभानंतर आयोजित मेजवानीत अतिथींना देण्यात येणार आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशातील सर्व प्रमुख प्रदेशांतील स्वादिष्ट पदार्थांसह पारंपरिक शाकाहारी थाळी दिली जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज