Rajasthan Congress : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने उदयपूरमधून राष्ट्रीय प्रवक्त्याला तिकीट दिले आहे. याशिवाय काँग्रेसने सिवानामधून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने एकूण 151 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. धोलपूर जिल्ह्यातील भासेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय कुमार जाटव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान […]
Jammu Kashmir Police : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार हे शहीद झाले आहेत. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला. डार हे पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले होते. […]
Sachin Pilot Divorced: दोन राजकीय मातब्बर घराण्यातील आणि जाती-धर्माच्या भिंती तोडणाऱ्या एका लव्हस्टोरीचा तब्बल वीस वर्षानंतर द एन्ड झाला आहे. राजस्थानचे काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांची मुलगी सारा (Sara Pilot) घटस्फोट झाला आहे. या दोघांचा घटस्फोट झाल्याचे पहिल्यांदाच पायलट यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघडकीस आले […]
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगाव जिल्हा बंदी लागू केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, शंभुराज देसाई […]
N Chandrababu Naidu : कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आज (31 ऑक्टोबर) उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर येताच ते म्हणाले, हा स्नेह मी कधीच विसरणार नाही. त्यांना पाहण्यासाठी नायडू यांचे समर्थक तुरुंगाबाहेर जमले होते. नातू नारा देवांसही आजोबांना भेटायला आला होता. राजमुंद्री तुरुंगातून बाहेर […]
Iphone Hacking : मागील काही दिवसांपूर्वी देशातल्या मोठ-मोठ्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर आलं होतं. या फोन हॅकिंगच्या प्रकरणाला नवं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशातल्या मोठ्या नेत्यांच्या आयफोनवर अलर्ट मेसेज आल्यानंतर अॅपल कंपनीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या धोक्याच्या सूचना चुकीच्या असू शकतात, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. Government Schemes : कांदाचाळ […]