पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University) ते गणेशखिंड रस्त्यालगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेड्सची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे (PMRDA) उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) […]
नवी दिल्ली : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण या निवडणुकीच्या तारीखेमध्ये बदल करण्यात आला आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार होती. पण १२ वी आणि पदवीची परीक्षा असल्यामुळे पुणे पोटनिवडणूकीची तारीख बदलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आज नवीन वेळा जाहीर केल्या आहेत. आज […]
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीनिमित्त (Maghi Ganesh Jayanti) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati mandir) आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं गणेश जन्म सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. भाविकांमध्ये माघी गणेश जंयंतीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला. […]
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीच्या (Shri Ganesh Jayanti) पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर (Dagdusheth Halwai Ganpati Temple) येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या (ता. २५ जानेवारी) सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी (Pune Traffic) करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन […]
पुणे : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र आजघडीला पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आधीच ठाकरे गट, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलेले असताना आता शिंदे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पुण्यात राष्ट्रवादीलाच धक्का दिला आहे. […]