पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यात जोरदार पाऊस होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे म्हाडा'च्या अध्यक्षपदी पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली. लोकसभेच्या काळात दिला होता राजीनामा.