पवारांसोबत राहूनही अजितदादांनी कधीच जाती-पातीच राजकारण केलं नाही; राज ठाकरेंचं विधान

पवारांसोबत राहूनही अजितदादांनी कधीच जाती-पातीच राजकारण केलं नाही; राज ठाकरेंचं विधान

Raj Thackeray Sabha in Pune : पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना राज ठाकरेंनी पहिला प्रहार शरद पवारांवर केला. राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 ला स्थापना झाली तेव्हापासून जातीपातीचं राजकारण सुरू झालं असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) यावेळी केला. तर दुसरीकडे माझे आणि पवारांचे अनेक मतभेद असतील. मात्र, एक गोष्ट नक्की सांगतो इतक्या दिवस शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी (Ajit Pawar) कधीच जाती-पातीच राजकारण केलं नाही अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजित पवारांच कौतूक केलं.

 

Ajit Pawar आताच मिशा काढा, 4 जूननंतर तर… भाऊ श्रीनिवास पवारांचा खोचक सल्ला

काहीच मुद्दा नसलेली निवडणून

यावेळी राज ठाकरेंनी आणीबाणीच्या काळात कुणाची लाट होती आणि पुढे काय झालं हे सांगताना सोनिया गांधी बाहेरच्या असा मुद्दा उपस्थित करून शरद पवार कसे बाहेर पडले हे सांगितलं. तसंच, 2024 ची ही पहिलीचं अशी लोकसभा निवडणूक आहे ज्या निवडणुकीला काही मुद्दा नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच, पुन्हा सत्तेत येणाऱ्या पक्षाचे मुरलीधर मोहळ उमेदवार आहेत म्हणून मी प्रचाराला आलो असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

 

अनेक लोकांनी शहर सोडली

या निवडणुकीत काही मुद्दा नसल्याने शिवराळ भाषेत प्रचार सुरू आहे असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. तसंच, महाराष्ट्राचं राजकारण इतक खालच्या पातळीवर कधी गेलं नव्हत अशी खंतही राज यांनी यावेळी व्यक्त केली. आज महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण पाहिलं तर इतकं वाईट झालं आहे की, अनेक लोकांना, विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात, भारतात राहण्याची इच्छा नाही असा दावाही राज यांनी यावेळी केला. आज पुण्यातील अनेक लोकं पुणं सोडून गेले यावरही राज ठाकरे बोलले.

 

बेरोजगारीची समस्या सोडविणार, पुणेकरांना मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

नियोजनशून्यतेने शहर बरबाद झाली

आजच्या शहरातील वातावरणात काही चांगला फरक नाही पडला तर मुंबईची वाट लागाला एक काळ लागला. मात्र, हे वातावरण असंच राहील तर पुण्याची वाट लागायला काही काळ लागणार नाही अशी भितीही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. आज पुण्याची लोकसंख्या 70 लाख आहे आणि वाहणं आहेत 72 लाख असं म्हणत नियोजन शुन्यतेमुळे शहर बरबाद होतात अशी भातीही राज यांनी यावेळी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube