सत्ता जाताच… मुंगळे पळाले, रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली

सत्ता जाताच… मुंगळे पळाले, रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली

Rohit Pawar On Sharad Pawar NCP 26th anniversary : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन (NCP 26th anniversary) साजरा होतोय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन आयोजित करण्यात आलाय. यावेळी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) देखील भावना व्यक्त केल्या आहेत.

वटवृक्षाचं खोड आजही घट्टपणे उभे

रोहित पवार यांनी म्हटलं की, संस्थापक तेच उलट नावाचा झाला विस्तार. चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेचे तुतारी आणि सोबतीला साहेब या नावावर प्रेम करणारे निस्वार्थ कार्यकर्ते. अशा परिस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Maharashtra Politics) आज वर्धापन दिन साजरा होतोय. गेल्या 26 वर्षात पक्षाच्या या रोपट्याचं आज वटवृक्ष झालं. काही पारब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं. पण फांद्यावर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले. वादळ आलं, दुष्काळ पाहिलं पण वटवृक्षाचं खोड आजही घट्टपणे उभे आहे, म्हणजेच आदरणीय पवार साहेब असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा

हा पक्ष कोणामुळे?

सत्ता आली काय अन् सत्ता गेली काय? सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे, सत्ता जाताच पळून गेले. मुंगीप्रमाणे अविरत कार्य करणारा कार्यकर्ता आजही पवार साहेबांसोबतच आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर सामान्य कुटुंबातील पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते, आपल्या विचारांवर विश्वास ठेवलेली जनता यांच्यामुळे हा पक्ष असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. सत्ता नाही तर संघर्ष करायचा, असं देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Video : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा; दमदार भाषण केल्यानंतर जयंतरावांचे राजीनाम्याचे संकेत

शक्ती प्रदर्शन करायचं नसतं

हा पक्ष पवार साहेबांमुळे आहे, हे नेते काहीही झाले तरी साहेबांबरोबर राहिले, त्यामुळे आहे. जयंत पाटलांसह अनेक नेत्यांचं नाव घेत रोहित पवार म्हणाले, यांना इतर पक्षातील लोक बोलवत असतील, पण हे सगळे साहेबांसोबत राहिले म्हणून त्यांचं सर्वांनी अभिनंदन करा. काही लोक म्हणतात, दुसरीकडे शक्ती प्रदर्शन आहे. मात्र, घरगुती कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करायचं नसतं, हा आपला घरगुती कार्यक्रम आहे. घरगुती कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन होत नसतं, तर प्रेमाचा वर्षाव होत असतो, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube