BCCI चा मोठा निर्णय; महिला व पुरुष दोन्ही संघ होणार एशियन गेम्समध्ये सहभागी
Asian Games 2023: आशियाई खेळ 2023 या वर्षाच्या अखेरीस चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले जाणार आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआय आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते.
ज्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्याच वेळी एकदिवसीय विश्वचषकही भारतात आयोजित केला जाईल. अशा स्थितीत पुरुष ब संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाईल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय या स्पर्धेत प्रमुख महिला खेळाडूंसह एक मजबूत संघ पाठवणार आहे.
यावेळी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तर 5 ते 23 ऑक्टोबर दरम्यान विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. 30 जूनपूर्वी बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवणाऱ्या खेळाडूंची यादी पाठवेल.
बीसीसीआयने 2010 आणि 2014 मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये क्रिकेट स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात त्याने भारताच्या पुरुष किंवा महिला संघाला पाठवले नव्हते. चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2018 मध्ये जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे आयोजन करण्यात आले नव्हते.
‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र’ योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड…
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघाने क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी दाखवली होती. संघाने त्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, संघाला रौप्यपदक जिंकण्यात यश आले.