हार्दिकच्या नेतृत्वाला सुरुंग, गिलचं प्रमोशन; गंभीरच्या ‘त्या’ ४ निर्णयांवर वाढलाय वाद
Gautam Gambhir Decision : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अखेर गौतम गंभीरने संघाची (Gautam Gambhir) निवड केली आहे. श्रीलंकेविरोधात 27 जुलैपासून सुरू (IND vs SL) होणाऱ्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा (Team India) करण्यात आली. संघ निवडीत गौतम गंभीरचा वरचष्मा दिसून आला. गौतम गंभीरने सर्वात आधी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार पदावरुन काढून टाकत संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती (Surya Kumar Yadav) दिली. रोहित शर्माने टी 20 संघाच्या (Rohit Sharma) कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचा जागी हार्दिकच कर्णधार असेल असे वाटत होते. पण तसे काही घडलेच नाही. या संघ निवडीतील चार महत्वाच्या गोष्टींची माहिती जाणून घेऊ या..
गौतम गंभीरची वाट खडतर; रोहित-विराटला पर्याय अन् 5 आयसीसी स्पर्धांचं चॅलेंज
हार्दिकच्या नेतृत्वाला सुरुंग
गौतम गंभीरने सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त करणं यात काहीच आश्चर्य नाही. पण काळजीची गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्याला कोणत्याही नेतृत्वातून बाहेर केले गेले ही आहे. तसेच टी 20 आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शुभमन गिलला उपकर्णधार केले आहे. याआधी 2023 मध्ये पांड्या संघाचा कर्णधार राहिला आहे. आता गिलची उपकर्णधार पदी निवडीवरून निवड समिती आणि गौतम गंभीर गिलला टीम इंडियाचा पुढील कप्तान म्हणून तयार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
शुभमन गिलचं प्रमोशन
नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषकात शुभमन गिल भारतीय स्क्वॉडमध्ये देखील नव्हता. आता मात्र श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला थेट संघाचा उप कर्णधार केलं आहे. या निवडीतून गंभीरने 2027 मधील विश्वचषकावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. रोहित शर्मा 37 आणि सूर्यकुमार यादव 33 वर्षांचा असल्याने गंभीर संघात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
अभिषेक, गायकवाड, कुलदीप बाहेर
टीम इंडियाच्या टी 20 विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कुलदीप यादवला थेट संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामागे त्याच्याकडील कामाचा वाढता ताण हे कारण असू शकतं. कारण एकदिवसीय सामन्यात कुलदीपला संधी मिळाली आहे. गंभीरने लखनऊ संघाचा युवा खेळाडू रवी बिश्नोईवर विश्वास दाखवला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात टी 20 सामन्यात फक्त 46 चेंडूत शतक करणाऱ्या अभिषेक शर्मालाही संघात स्थान मिळालं नाही. याच पद्धतीने चेन्नई संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही संघात जागा मिळाली नाही. रियान परागला दोन्ही स्क्वाडमध्ये संधी मिळाली आहे.
Team India: टीम इंडियामध्ये 125 कोटींची झाली वाटणी; कोणाला किती पैसे मिळाले?
केकेआरच्या दोन स्टार्सना गंभीरचा सपोर्ट
कसोटी क्रिकेट टाळून बीसीसीआयच्या निशाण्यावर आलेल्या श्रेयस अय्यरचा वनवास संपला आहे. सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर अय्यर पुन्हा राष्ट्रीय संघात परतला आहे. गंभीरने अय्यरची निवड करणं यात फार काही आश्चर्य नाही. कारण या दोघांनी केकेआर संघाला 2024 मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं होतं. केकेआरला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हर्षित राणा (वनडे) आणि रिंकू सिंह (टी20) देखील गंभीरने निवडलेल्या संघाचा हिस्सा आहेत.