मीडियानेच केली पोलखोल! संतापलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
ICC Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिला सामना होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघात पहिला सामना होणार आहे. पंरतु, या स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तानवर सातत्याने टीका होत आहे. मध्यंतरी येथील स्टेडियमच्या मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टीकेचे धनी ठरले होते. आता तर येथील मीडियानेही याच मुद्द्यावर बोर्डाला खिंडीत गाठलं. बोर्डाच्या कामकाजाची चांगलीच पोलखोल केली. यानंतर संतापलेल्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. दोन क्रिकेट स्टेडियममध्ये मीडियाच्या एन्ट्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार? BCCI चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
टूर्नामेंट सुरू होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी पीसीबीकडून जय्यत तयारी सुरू आहे. कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यावेळी बोर्डाने एक नवा आदेश जारी केला आहे. मीडियाला फक्त ठरवून दिलेल्या दिवशीच स्टेडियमचा दौरा करण्याची परवानगी देण्यात येईल. पीसीबी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच व्हिडिओ काढता येईल असे या आदेशात म्हटले आहे.
खरंतर स्टेडियम तयार करण्यास उशीर होत असल्याच्या बातम्या मिडियात सातत्याने येत होत्या. त्यामुळे पीसीबीचे अधिकारी चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे पीसीबीला हा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयानुसार लाहोर आणि कराची येथील स्टेडियममध्ये प्रवेशासाठी मिडिया प्रतिनिधींना आधी क्रिकेट बोर्डाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही परवानगी न घेता लोक स्टेडियममध्ये प्रवेश करत होते. व्हिडिओही बनवत होते. त्यामुळे आमच्या अडचणी वाढल्या होत्या. मीडियाकडून सातत्याने स्टेडियमच्या अर्धवट कामांचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केले जात आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात चॅम्पियन्स ट्रॉफी देशात होणार नाही असा संशय बळावू लागला होता. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले.
क्रिकेटर Rinku Singh आणि यूपीची खासदार अडकणार लग्न बंधनात ? पण मुलीच्या वडिलांकडून वेगळीच माहिती
या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे. बांग्लादेश विरुद्ध पहिला सामना आहे. या स्पर्धेत भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे हायब्रीड मॉडेल लागू करण्यात आले आहे. भारतीय संघाचे सामने दुबईत होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यासाठी तयार नव्हते. नंतर दबाव वाढू लागल्यानंतर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला माघार घ्यावी लागली.