मोठी बातमी! पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवर बंदी; कारणही अत्यंत धक्कादायक

मोठी बातमी! पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवर बंदी; कारणही अत्यंत धक्कादायक

Pakistan News : प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि क्रिकेट बोर्ड जोरदार प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मात्र धक्का देणारी बातमी आली आहे. फुटबॉल जागतिक संघटना फीफा (FIFA) ने पाकिस्तानला मोठा दणाक दिला आहे. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. फीफाने हा निर्णय का घेतला याचं कारणही समोर आलं आहे.

पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी आवश्यक संवैधानिक संशोधनांचा अवलंब करण्यात पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन अपयशी ठरले आहे. यानंतर फीफाने फेडरेशनला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफएफ काँग्रेस फीफा/एएफसीच्या प्रस्तावित संविधानाला मंजुरी दिल्यानंतर पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार आहे.

2021 मध्येही निलंबनाची कारवाई

पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवर याआधी 2021 मध्येही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तान फुटबॉलला निलंबित करण्यात आले होते. संचालनाच्या पद्धतीचा विचार करून फीफाने पाकिस्तानबरोबरच चाडच्या नॅशनल सॉकर फेडरेशनलाही निलंबित केले होते. जून 2022 मध्ये पाकिस्तानचे निलंबन हटवण्यात आले होते. परंतु, आता अडीच वर्षांनंतर पुन्हा पाकिस्तान फुटबॉलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

फुटबॉलपटूने संपवले जीवन; 6 वर्षांपूर्वी आई, भावानं देखील असंच उचललं होतं टोकाचं पाऊल

2025 आणि 2021 च्या आधी पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला 2017 मध्येही फीफाने मोठा झटका दिला होता. 2021 च्या आधी 2017 मध्येही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाचे कारण देत पाकिस्तान फुटबॉलला निलंबित करण्यात आले होते. अशा पद्धतीने तीन वेळेस निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान फुटबॉल जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube