नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचं सुरू असलेलं आंदोलन समाप्त झालं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक झाली. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचं सुरू असलेलं आंदोलन समाप्त झालं. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी कुस्तीसंघाचं काम आणि लैंगिक शोषणासंदर्भात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचं अश्वासन दिलं. ही समिती 4 आठवड्यांमध्ये अहवाल […]
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघ मालिका विजयाकडे वाटचाल करू शकतो. दुसरा एकदिवसीय सामना छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर यापूर्वीही अनेक सामने […]
मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला पहिल्या वनडे सामन्यात 12 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 350 धावांचे मोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात 131 धावांवर न्यूझीलंडचे 6 फलंदाज माघारी परतले होते. मात्र किवी संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. परंतु हा सामना भारताने जिंकला. मात्र सामना झाल्यानंतर, माजी भारतीय […]
Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023) विदर्भ संघाकडून नवा इतिहास रचण्यात आलाय. गुजरातविरुध्दच्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करीत विदर्भ संघाने एक नवा विक्रम केलाय. विदर्भ संघाने दिलेल्या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गुजरात संघ करु शकला नसून गुजरात संघ अवघ्या 54 धावांत सर्वबाद झाला. गुजरातला 17 धावांनी सामना गमवावा लागला […]
मुंबई : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाकडून 72 तासांत उत्तर मागितले आहे. तसे न केल्यास कुस्ती संघटनेवर कारवाई केली जाईल. मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत लखनौमधील महिला कुस्ती शिबिरही रद्द केले आहे. लखनौ येथील राष्ट्रीय […]
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर हाशिम आमला याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे. यापूर्वी, आमलाने 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. आमलाने चेस्टर-ले-स्ट्रीट येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. विश्वचषकानंतर अमला आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा म्हणेल, अशी अपेक्षा होती. हाशिम अमलाच्या काही दिवस आधी […]