- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
RCBच्या पराभवानंतर नवीन-उल-हकने डिवचले; सोशल मीडियावर भिडले विराटचे चाहते
Virat Kohali Vs Navin Ul Haq : सध्या सुरु असलेल्या आयपीएल हंगामात आरसीबीचा गुजरात टायटन्सने पराभव केल्याने त्यांचे यावर्षीचे आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आले आहे. या परभवामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणाऱ्या नवीन-उल-हक याने प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीला ट्रोल केले. याआधी विराट कोहली आणि नवीन-उल-हक आरसीबी विरुद्ध लखनौ […]
-
IPL : विराट कोहलीचे सलग दुसरे शतक; RCB चे गुजरातसमोर 198 धावांचे लक्ष्य
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 198 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला आहे. या सामन्यात विराट कोहलीने 61 चेंडूत 101 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. नाणेफेक हरल्यानंतर रॉयल RCB प्रथम फलंदाजीसाठी उतरली […]
-
IPL : मुंबईच्या प्लेऑफमधील आशा कायम; हैदराबादवर शानदार विजय, कॅमेरून ग्रीनचे दमदार शतक
MI vs SRH : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माच्या संघाने अवघ्या 18 षटकांत 2 बाद 201 धावा करत सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या. तथापि, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे चाहते प्रार्थना करतील गुजरात टायटन्सने […]
-
IPL 2023 MI Vs SRH : हैदराबादचे मुंबईसमोर 201 धावांचे लक्ष्य, मयंक-विव्रतचे अर्धशतक
IPL 2023 MI Vs SRH : च्या 69 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईसाठी हा सामना अंतिम चारमध्ये जागा करण्यासाठी महत्वाचा. जर मुंबईने हा सामना गमावला तर स्पर्धेतून बाहेर जाईल. त्याचवेळी, जिंकल्यानंतरही संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही. त्याला अजूनही आरसीबी विरुद्ध गुजरात […]
-
MI vs SRH : मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
MI vs SRH : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या या मोसमात आज पुन्हा हेडर सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना लवकरच मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सुरू होईल. वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या संघात बदल केला आहे. हृतिक शोकीनच्या जागी कुमार […]
-
IPL Points Table: चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ, पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातशी भिडणार
IPL Points Table: दिल्ली कॅपिटल्सचा 70 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून, चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. तत्पूर्वी, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. याशिवाय गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना जवळपास निश्चित झाला आहे. वास्तविक लखनौ सुपर जायंट्सला त्यांचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. […]










