IND vs AUS : शुभमन गिल नंबर वन फलंदाज होण्यास मुकला, कारण…

IND vs AUS : शुभमन गिल नंबर वन फलंदाज होण्यास मुकला, कारण…

IND vs AUS : भारताचा स्टार शुभमन गिलने(Shubman Gill) आयसीसी वन डे क्रिकेटमध्ये एक नंबरचा फलंदाज होण्याची संधी गमावली आहे. कारण सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलला(Shubman Gill) संधी देण्यात आलेली नाही. वनडेमधील फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आहे. शुभमन गिल हा बाबरजवळ पोहचण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याला आजच्या तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नंबर एकचा फलंदाज होण्यापासून शुभमन गिल(Shubman Gill) मुकला आहे.

Naseeruddin Shah: वडील मुलांच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाहचे भाष्य; म्हणाले, ‘आयुष्यातील खलनायक…”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाज शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली होती. शुभमनने या सामन्यात 74 धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर इंदोरमधील वनडे सामन्यात शुभमनने धमाकेदार शतक ठोकल्याचं पाहायला मिळालं होतं. पहिल्या दोन सामन्यात खेळल्यानंतर आजच्या तिसऱ्या सामन्यात शुभमनला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या शुभमन आयसीसीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून शुभमनचे रेटिंग गुण 814 आहेत.

नगर-मनमाड रस्त्यासाठी मंत्रालयात बैठक; ठेकेदाराला सुचना : विखे-पाटलांनी दिली नवी डेडलाईन

तर दुसरीकडे आयसीसीच्या क्रमवारील पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आहे, बाबरचे रेटिंग गुण 857 आहे, त्यामुळे आयसीसीच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावण्यासाठी शुभमनला अवघे 43 रेटिंग गुणच कमी आहेत, जर आज शुभमनला खेळण्याची संधी मिळाली असते तर शुभमने पाकचा कर्णधार बाबर आजमला मागे टाकत क्रमवारीत पहिल्या स्थानावर उडी घेतली असते.

‘मोदींना फोन कर तरच बुलेटवरून खाली उतरेन’; महिलेची वाहतूक पोलिसांना दादागिरी

शुभमन गिलने आत्तापर्यंत भारतासाठी 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 35 सामन्यांमध्ये शुभमन गिलने 66.1 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राईक रेटने 1917 धावा केल्या आहेत. शुभमन गिलच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 6 शतके आहेत. तर या खेळाडूने 9 वेळा पन्नास धावांचा आकडा पार केला आहे.

याशिवाय शुभमन गिलने वनडे फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्याचवेळी, बाबर आझमने 108 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.16 च्या सरासरीने आणि 89.13 च्या स्ट्राइक रेटने 5409 धावा केल्या आहेत. बाबर आझमने वनडे फॉरमॅटमध्ये 19 शतके झळकावली आहेत. तर पाकिस्तानी कर्णधाराने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 28 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube