पहिलाच सामना गमावला! भारताच्या लेकींचा पराभव, न्यूझीलंडचा 58 धावांनी विजय..
IND W vs NZ W : महिला विश्वकप स्पर्धेत भारताची सुरुवात पराभवाने झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच (INDW vs NZW) सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताला 58 धावांनी (Team India) पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक धावा केल्या. ईडन कार्सनने भारताला सुरुवातीलाच धक्के दिले. या सामन्यात भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यामुळे मोठी भागीदारी करता आली नाही. भारताच्या पराभवाचं हे एक मोठं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने सामना जिंकला; आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचं
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 15 ओव्हर्समध्ये फक्त 109 धावा केल्या होत्या. नंतरच्या पाच ओव्हर्समध्ये मात्र कर्णधार सोफी डिवाइन आणि अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजी फोडून काढली. कर्णधार सोफीने 36 चेंडूत 57 धावा केल्या. यामुळे किवी संघाला 160 धावांचा पल्ला गाठता आला. टीम इंडियासाठी रेणुका सिंहने 2 तर अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. 42 धावा झालेल्या असतानाच भारताचे तीन आघाडीचे फलंदाज बाद झाले होते. मिडल ऑर्डरमध्ये जेमिमा रॉड्रीग् आणि रिचा घोष यांनी अनुक्रमे 13 आणि 12 धावा करून बाद झाल्या. 75 धावा असताना निम्मा संघ बाद झाला होता. पुढील पाच विकेट फक्त 27 धावांत बाद झाल्या.
न्यूझीलंडच्या रोझमेरी मायर आणि टाहूहू यांनी प्रभावी मारा केला. रोझमेरीने 4 ओव्हर्समध्ये 19 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे लियाने तीन विकेट घेत भारतीय संघाला मोठे धक्के दिले. आता भारतीय संघाचा दुसरा सामना उद्या रविवारी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारताने पहिला सामना 58 धावांनी गमावला आहे. तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे.
Women’s T20 World Cup : भारत पाकिस्तान भिडणार! जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सामना
२० ऑक्टोबर फायनल सामना
महिला टी २० विश्वकप स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना १७ ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. दुसरा सेमी फायनल सामना १८ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना शारजाहमध्ये होणार आहे. यानंतर २० ऑक्टोबरला सेमीफायनल विजेत्या दोन संघात अंतिम सामना होणार आहे. हा फायनल सामना दुबईत होणार आहे. विश्वकप स्पर्धा आधी बांग्लादेशात होणार होती. परंतु, येथे उसळलेला हिंसाचार पाहता स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले. आता ही स्पर्धा युएईत होत आहे.