- Home »
- BJP
BJP
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची रिस्क भाजपला फायद्याची की तोट्याची?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सर्व नेतेही माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते याबाबत बोलत होते. आता जसे ते बोलत […]
Lok Sabha Elections : चार मतदारसंघातील चित्र स्पष्ट, भाजप विरुद्ध काँग्रेसचा थेट सामना
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या सात उमेदवारांपैकी चार मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित तीन मतदारसंघात अद्याप महायुतीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत त्यामुळे येथील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पुणे लोकसभा […]
Loksabha Election : शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील सात जणांची उमेदवारी घोषित केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव काळगे, कोल्हापूरमधून शाहू महाराज, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडावी यांना उमेदवार जाहीर झाली आहे. Sangali Loksabha : चंद्रहार पाटीलच सांगलीतून लढणार, उद्धव […]
… तर, मी जानकरांना थांबवू शकते; पंकजा मुंडेंचं पक्षाकडे बोट
Pankaja Munde : पक्षाने मला महादेव जानकरांबाबत (Mahadev Jankar) जबाबदारी दिल्यास मी जानकरांना थांबवू शकते, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पक्षाकडे बोट दाखवलं आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Loksabha Election) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच एकच चर्चा रंगली […]
श्रीरंग बारणे अन् संजोग वाघेरे येणार आमने-सामने; मावळच्या प्रश्नांवर होणार ‘फाईट’
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barane) आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे दोघेही आमने-सामने येणार आहेत. येत्या रविवारी (24 मार्च) रोजी ‘दिशा फाऊंडेशन’च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात […]
अखेर मनसेचंही ठरलं! शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मैदानात उतरणार…
Lokabha Election : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मॅरेथॉन बैठकी घेतल्या जात आहेत. अशातच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. मनसे महायुतीत सामिल झाल्यानंतर […]
‘…तर आमचाही शिवसेना उमेदवारांना विरोध’; अजितदादांच्या आमदाराने बोलून दाखवलं
Anna Bansode : विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) महायुतीचा धर्म पाळला नाहीतर शिवसेनेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचा विरोध असणार असल्याचा इशारा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करीत आहेत. याच मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या […]
मोदी सरकारला मोठा धक्का : फॅक्ट चेकिंग युनिटला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली : सोशल मीडियावरच्या रेग्युलेशनसाठी केंद्र सरकारकडून (Central Government) आयटी नियमांतर्गत स्थापित करण्यात आलेल्या फॅक्ट चेकिंग युनिटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलेली आहे. काल (20 मार्च) केंद्र सरकारने याबाबतचे नोटिफिकेशन काढलेले होते. हे युनिट काय योग्य काय अयोग्य हे ठरविणार आणि त्यानुसार सोशल मीडियावरून कंटेंट हटवावा लागणार, अशी तरतूद या नोटिफिकेशनमध्ये होती. दरम्यान, […]
पोस्टर छापायलाही पैसे नाहीत, लढणार कसं?; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं कंबरडं मोडलं
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत इलेक्टोरल बाँडचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत झालेली दुरावस्था जाहीरपणे सांगितली आहे. पक्षाची खाती गोठावण्यात आल्याने आमच्याकडे पोस्टर छापायलाही पैसे नसल्याचे सांगत निवडणुका कशा लढवणार? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उपस्थित केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर […]
गोमांसाच्या कत्तलखान्यांकडून निवडणूक रोखे घेणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाणा लोकसभेचा (Buldhana Lok Sabha) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणणारे गोमांस कत्तलखाने चालवणाऱ्यांकडून निवडणूक रोखे घेतात, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, कारण असल्या थोतांडाला […]
