आज गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेत्यांच्य घरी देखील बाप्पाचं आगमन झालं.
मराठा आरक्षण देणं ही जबाबदारी सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही 5 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिले.
दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला असल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलीयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा निघाल्याचंही पडळकरांनी यावेळी सांगितलंय.
एसटी महामंडळ कृती समितीची मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच बैठक पार पडली असून ही बैठक निष्फळ ठरलीयं. उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे.
छत्रपती शिवरायांची एकदाच काय तर शंभरवेळा माफी मागणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलीयं. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, ते दुर्देवी आहे. आमचे मंत्री परिस्थितीची पाहणी करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीयं.
आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
'खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा, या शब्दांत योजनांचा पाढा वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चपराक लगावलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
CM एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अभिनेते किरण माने यांनी टीका केली.
लाडकी बहीण, भाऊनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. ते बीडमध्ये कृषी महोत्सवात बोलत होते.