सगेसोयरेचं आरक्षण मिळणार का? CM शिंदे म्हणाले, तो विषय कायद्याच्या चौकटीत…
CM Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) अनेक आंदोलन करूनही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नहीत. दरम्यान, जरांगेंनी 29 सप्टेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली असून मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्ह उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) यावर भाष्य केलं. सगेसोयरेचा विषय कायद्याच्या चौकटीत बसण्याचे काम सुरू असल्याचं शिंदे म्हणाले.
दापोलीत काका – पुतण्याचा सामना रंगणार, अनिकेत कदम वाढवणार रामदास कदमांचं टेन्शन?
मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी आज एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आम्ही केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं गेलं होते. मात्र नंतर ते न्यायालयात टिकू शकलं नाही. ते कोणाला टिकवता आलं नाही, हे सर्वांना माहीत आहे. आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदी ज्यांच्याकडे आहेत, त्यांना आरक्षण देत आहोत. शिवाय सगेसोयरेचा विषय कायद्याच्या चौकटीत बसण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेवर आठ ते दहा लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्याचा अभ्यास केला जात आहे. शेवटी, कोणताही विषय कायद्यात बसवला तरच टिकणार ना, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तेराव्याहून परतणाऱ्या टेम्पोला बसची जोरदार धडक,भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू…
आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी
मराठा आरक्षण देणं ही जबाबदारी सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही 5 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिले. मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे सिद्ध करण्यासाठी आम्ही आयोग नेमला. त्यानंतर मराठा समाज मागास असल्याचे आम्ही सिद्ध केलं आणि दहा टक्के आरक्षण दिल्याचंही शिंदे म्हणाले.
विरोधकांना नाही, आम्ही आरक्षण दिलं…
मनोज जरांगेंनी महायुतीचे 113 आमदार पाडणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याविषयी विचारलं असता शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी खूप मोठं काम केलं. पण त्यांनी लक्षात घ्यावं की, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे होते, त्यांनी ते दिले नाही, आम्ही दिले. आता त्यांनी ते टिकवण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे.
आम्ही ओबीसी आणि इतर समाजाचे आरक्षण रद्द न करता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. हे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण ते कोण टिकू देत नाही, त्याची माहिती जरांगेंनी घ्यावी, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.