पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला आहे.
या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.
माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याचं डीमोशन झालं.
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
सन 2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल अहिल्यानगरमधील जनतेनं यंदा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केले होते.