भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.
यावेळी मंत्र्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकाला एक-एक खातं देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांच्या हाती असल्या तरी खर्चाचे अधिकार मात्र शिंदेनाच राहणार असं चित्र उभं राहत आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. आता त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री करण्यात आलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. या नेत्यांना कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.
राज्यात ४२ मंत्री खात्यांविना आहेत. खरे मंत्री फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.