कार्यकर्त्यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहू नका. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.
खासदार झाल्यानंतर लंके यांनी सर्वप्रथम कांदा व दूध दराचे आंदोलन हाती घेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले.
मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे. अन्यथा शरद पवार हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील, असा इशारा फाळके यांनी दिला.
ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी 20 विश्वकप जिंकला त्याच पद्धतीने आता महायुती राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकणार आहे.
मनोज जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असे नाही. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन भरकटले - विखे
नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असलेले सुजय विखे यांच्या विजयासाठी त्यांचे वडील - मंत्री राधाकृष्ण विखे हे पंढरपुरातील विठ्ठल चरणी लीन झालेत.
शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असली तरी खरा सामना राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच आहे.
Lok Sabha Election च्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते.
Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनत आहे. त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्य घडवू शकणार नाहीत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, […]
Sharad Pawar replies to Radhakrishna Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर शहरात आहेत. काल शहरातील गांधी मैदानात त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि जिल्ह्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत विखे यांनी केलेल्या आरोपांवर […]