- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
Nashik Loksabha : ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी | LetsUpp Marathi
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सध्या नेमकी काय स्थिती आहे? आणि खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार? याबद्दलचा लॅट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…
अजितदादांचा खांदा, भाजपवर निशाणा; मोरारजी देसाईंचा संदर्भ देत पवारांनी सांगितली कार्यक्षमता
Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात शाब्दीक वाद मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बंडखोरीनंतर ज्या ज्यावेळी अजितदादांनी भाषण केले. त्या-त्या वेळी अजित पवारांनी पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना आता तरी थांबले पाहिजे असा सल्ला दिला आहे. अजितदादांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वयावर अखेर पवारांनी मोरारजी देसाईंचा संदर्भ देत […]
Sharad Pawar : नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा; पवारांनी व्यक्त केली चिंता
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा आहे. असं म्हटलं आहे. तसेच नार्वेकरांनी अशा भेटी घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. असा देखील आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते आज (9 जानेवारी) दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. Krishna- Ayesha Shroff: ‘आई […]
Sharad Pawar : आव्हाडांना दिल्लीत धाडणार; मविआच्या बैठकीचा पवारांनी सांगितला प्लॅन
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (9 जानेवारी) दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे बैठक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे राष्ट्रवादीच्या वतीने जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणारे असून त्यासाठी मी […]
पवारसाहेब रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या 84 व्या वर्षीदेखील माणूस एवढ्या जिद्दीने लढतोय, हा सर्वांसाठी मोठा आदर्श असला पाहिजे. या वयामध्ये देखील ते एकदम कुल आहेत. त्यामुळे अजितदादांची अडचण कशाला असायला पाहिजे? असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांना विचारला आहे. पवारसाहेब हे रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले […]
‘शरद पवारांनी काळजी घेतली असती तर आज..,’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
सुप्रिया सुळे माझी जेवढी काळजी घेतात, त्यापेक्षा 10 टक्के जरी शरद पवारांनी (Sharad Pawar) योग्यवेळी काळजी घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) लगावला आहे. दरम्यान, पुण्यात आज संघटनात्मक बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी […]
‘काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना!’ अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]
‘वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत’, शरद पवार यांनी व्यक्त केली भावना
Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. प्रायोगिक […]
‘आमच्या राजकीय प्रयोगाचं कथानक चांगलं, विचार करा’; CM शिंदेंची पटेलांना थेट चित्रपटाचीच ऑफर
Eknath Shinde : ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी रंगभूमीवर केलेले धाडसी प्रयोग इतिहासातील सोनेरी पानं आहेत. ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत. राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात. आम्ही दीड वर्षांपूर्वी राजकारणात एक धाडसी प्रयोग केला होता त्याचीही नोंद इतिहासात नक्कीच होईल. मी जब्बार पटेल यांना सांगतो तुमच्यासाठी हे चांगलं कथानक आहे नक्की […]
Sharad Pawar vs Congress | शरद पवारांशी राज्यातील काँग्रेस नेत्यांचा पंगा ? LetsUpp Marathi
भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. काय कारण आहे ते व्हिडिओतून घेऊया…