पंजाबला महापूराचा तडाखा! 48 जणांचा बळी, 20 लाख लोक संकटात, 4 लाख बेघर

Heavy Rain Panjab Flood 2025 : पंजाब राज्य सध्या प्रचंड पुराच्या विळख्यात सापडले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गावे आणि शहरे पाण्याखाली गेल्याने लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत 48 नागरिकांचा मृत्यू झाला असून, अजूनही 3 जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
शेतीचे प्रचंड नुकसान
मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त पठाणकोट जिल्ह्यातच मृत्यूची (Heavy Rain) संख्या सर्वाधिक असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे 1.76 लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी सांगितले की, पुरामुळे बंद असलेली शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील. खाजगी शाळा 8 सप्टेंबरपासून तर सरकारी शाळा 9 सप्टेंबरपासून सुरू (Panjab Flood 2025) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्याठिकाणी अजूनही पूराचे परिणाम गंभीर आहेत, तिथे संबंधित उपायुक्त शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतील.
बचाव कार्य सुरूच
आप नेते मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात साचलेली (Panjab) वाळू आणि गाळ स्वतःच्या खर्चाने बाहेर काढण्याची मुभा दिली जाईल. पुढील हंगामात पेरणी करताना हा मुद्दा शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरू शकतो. पूरग्रस्त भागात NDRF, BSF, लष्कर, पोलिस दल आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. दरम्यान, पोंग धरण आणि भाक्रा धरणातील पाणी पातळी उच्चांकाजवळ पोहोचली आहे. काही प्रमाणात पाणी कमी झाले असले तरी धरणांवरील ताण कायम आहे.
दशकातील सर्वात मोठा पूर
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत 2,050 गावांमध्ये जवळपास 20 लाख लोक प्रभावित झाले असून यातील जवळपास 3.88 लाख लोक विस्थापित झाले आहेत. आतापर्यंत 22,938 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्यभरात 219 मदत शिबिरे उभारण्यात आली असून सुमारे 5,400 लोकांना त्यामध्ये आसरा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पंजाब गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण पूरस्थितीचा सामना करत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतत सूचना दिल्या जात असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.