महापारेषणमध्ये 2541 पदांची बंपर भरती, महिन्याला 88 हजार रुपये पगार

  • Written By: Published:
महापारेषणमध्ये 2541 पदांची बंपर भरती,  महिन्याला 88 हजार रुपये पगार

 

Mahatransco Bharti 2023: राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची (Job) बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनी लिमिटेडनं (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) बंपर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) ने विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2541 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

सीएम शिंदे जाणार एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचाराला, अशोक गेहलोतांना देणार टक्कर 

भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशेनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – विद्यूत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2

एकूण पदांची संख्या– 2,541

पदांचा तपशील
विद्यूत सहाय्यक (पारेषण) – 1903 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ – 124 पदे
तंत्रज्ञ वर्ग 1 – 200 जागा
तंत्रज्ञ वर्ग II – 314 जागा

शैक्षणिक पात्रता –
विद्यूत सहाय्यक (पारेषण) – नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCTVT), नवी दिल्ली द्वारे इलेक्ट्रिकल टेक्निशियनच्या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.

वरिष्ठ तंत्रज्ञ/तंत्रज्ञ 1/ तंत्रज्ञ 2 – नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCTVT), नवी दिल्ली द्वारे अॅप्रेंटिसशिप कायदा-1961 अंतर्गत प्रदान केलेल्या इलेक्ट्रिकल टेक्निशियनच्या व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र धारक. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे आणि तपशीलवार माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.

सरकारी काम अन् अर्धा तास थांबणं भोवलं; न्यायालयाने पोलिसांना दिली गवत कापण्याची शिक्षा 

आवश्यक कागदपत्रे-

या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सादर करणे आवश्यक आहे. या पदाच्या भरतीसाठी, मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

पगार:
विद्युत सहाय्यक (पारेषण) – प्रथम वर्ष – 15 हजार, द्वितीय वर्ष – 16 हजार, तृतीय वर्ष – 17 हजार
वरिष्ठ तंत्रज्ञ- 30 हजार 810 ते 88 हजार 1190
तंत्रज्ञ वर्ग 1 – 29 हजार 935 ते 82 हजार 430
तंत्रज्ञ वर्ग २ – 29 हजार 35 ते 72 हजार 857

अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www.mahatransco.in/

असा अर्ज करा-
उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करतांना अर्जात कोणतीही चुक राहिल्यास अर्ज नाकरल्या जाईल. भरतीशी संबंधित अधिक आणि तपशीलवार माहितीसाठी, कृपया खालील लिंकवर जाहिरात पहा.

https://drive.google.com/file/d/131xCxvAy1fAbFsAscldLbzVQY5SZ_EzX/view

https://drive.google.com/file/d/1tib-lNGRRgMmc9GHGqCHv3rmoJ0nUGV7/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube