मराठ्यांचा द्वेष अंगावर घेऊ नका, मी जर राजकारणात आलो…; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्री शिंदेंना (CM Shinde) मराठा आरक्षण (Maratha Reservation) द्यायचं आहे, पण फडणवीस जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत, अशी टीका जरांगेंनी केली. तर तर आरक्षणामध्ये मी अडथळा आणला असेल. तर मी त्याच क्षणी राजीनामा देईन, असं फडणवीस म्हणाले. यावर आता जरागेंनी प्रतिक्रिया दिली.
‘लाडकी बहीण योजने’त खोडा घालण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र
मराठ्यांचा द्वेष अंगावर घेऊ नका
मनोज जरांगेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, तुम्ही हे सर्व केलं आहे. तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं. तुम्ही मराठ्यांचा द्वेष अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पण मी जर राजकारणात आलो तर तुम्हाला सीट निडणूक देणार नाही, हे ठासून सांगतो. मला माझ्या समाजावर होणारा अन्याय सहन होत नाही, असं म्हणत जरागेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते द्या..
जरांगे पुढे म्हणाले, आम्ही तुम्हाला विरोधक मानलं नाही. हे तुम्ही का समजून घेत नाही. आम्हाला त्या राजकारणाची गरज नाही. मात्र, तुमच्यावर अशी भाषा बोलायला वेळ का आली? शेवटी, तुम्ही राज्यातील कर्ते आहात. आता तुम्ही इतक्या हताशपणे राजीनामा देईल, असं म्हणायला लागला. मराठ्यांच्या विरोधात गेल्याचा तुम्हाला पश्चाताप झाला. तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ विनंती आहे. मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? तुम्ही ज्या केसेस केल्या, त्या पण मागे घेतल्या नाही, असं जरांगे म्हणाले.
SEBC आरक्षण आमच्यावर लादलं
आम्ही SEBC आरक्षण मागितले नसून तुम्ही आमच्यावर लादलं. तुम्ही दरेडकरांना माझ्या विरोधात बोलायला पुढं केलं. तुम्ही सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. पण तुम्ही फक्त SEBC आरक्षण दिलं. तुम्ही आमच्या पोराचं वाटोळ करत आहात अन् तुम्हीच म्हणता, माझ्या विरोधात गैरसमज पसरू लागले आहेत, असं जरांगे म्हणाले.
भुजबळांना तुम्ही ताकद दिली
आम्ही गैरसमज पसरवले नाहीत. यात काय खोटं आहे, तुम्हाला हात जोडून सांगतो आता मराठ्यांचा द्वेष करणं सोडून द्या. मराठ्यांचं वाटोळ होईल, असं भुजबळ सांगतात. तुम्ही त्यांचं ऐकू नका. तुम्ही सर्वाच जास्त भुजबळांचे ऐकलं. भुजबळांना तुम्ही ताकद दिली. तुम्ही छगन भुजबळांना ओबीसली नेते गोळा करायला लावले. फडणवीस साहेब तुम्ही हे कसं नाकारता? असं जरांगे म्हणाले.