प्रसारभारतीमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, एकूण १७ पदांसाठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा
Prasar Bharati Bharti 2023 : आजही ‘दूरदर्शन’ हे माध्यम विश्वात मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. अनेक लोक येथे काम करण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. ‘प्रसार भारती’ (Prasar Bharati) ही राष्ट्रीय पातळीवरील सरकारी संस्था असल्याने तिचे महत्त्व वेगळे आहे. दरम्यान, आता प्रसारभारतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. प्रसार भारती अंतर्गत ‘एक्सपेन्स ट्रेनी’ (Cost trainee) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रसार भारती भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – खर्च प्रशिक्षणार्थी
एकूण पदांची संख्या-17
शैक्षणिक पात्रता –
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे आयोजित CMA इंटरमीडिएट परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, कृपया भरतीची मूळ जाहिरात पहा.)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://prasarbhati.gov.in/
Ajit Pawar : मी आठवण करून दिली, पण जयंतराव एकवर्ष करत करत तिथेच; भुजबळांनंतर अजितदादांचाही टोला
पगार –
पहिले वर्ष – 10 हजार रुपये.
दुसरे वर्ष – 12 हजार 500 रुपये.
तिसरे वर्ष – रु. 15 हजार.
असा अर्ज करा-
तुम्ही भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
अर्जाच्या तपशीलवार सूचना http://www.prasarbhati.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/16xiKlEAu_6o-tC_VDTVvpVat4A34o6Ut/view