पोलीस, एनआय आणि एटीएस यंत्रणा कशी काम करते? दहशतवाद्यांचा मनसुबा काय असतो? यासंदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी लेट्सअपने पुणे एटीएसचे माजी प्रमुख भानुप्रताप बर्गे यांच्याशी संवाद साधला होता.
राष्ट्रवादी-शिवसेना बंडानंतर आता पुढं काय होणार? या दोन बंडामधील फरक काय? दोघांची 2024 ची रणनीती कशी असणार? यासह अनेक मुद्यांवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण केलंय, नक्की पाहा!
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकरी येथील लखपती तर काही करोडपती झाले आहेत.
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदाचा वाद पुन्हा उफाळून आलाय. आता वाराणसी सत्र न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व खात्याने सर्वेक्षण (ASI) करण्याचे आदेश दिले आहेत. तर या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण काय आहे. ASI सर्वेक्षण म्हणजे काय हे जाणून घेऊया..
पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रदेशाध्यक्ष अर्थात जयंत पाटील आणि सुनील तटकरे आमने-सामने आले. विशेष म्हणजे दोघेही यावेळी अत्यंत खेळीमेळीत बोलताना दिसून आले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.