वाराणसीतील ज्ञानवापी मशिदाचा वाद पुन्हा उफाळून आलाय. आता वाराणसी सत्र न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व खात्याने सर्वेक्षण (ASI) करण्याचे आदेश दिले आहेत. तर या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण काय आहे. ASI सर्वेक्षण म्हणजे काय हे जाणून घेऊया..
पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रदेशाध्यक्ष अर्थात जयंत पाटील आणि सुनील तटकरे आमने-सामने आले. विशेष म्हणजे दोघेही यावेळी अत्यंत खेळीमेळीत बोलताना दिसून आले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. पश्चिम घाट म्हणजे काय? तो का संवेदनशील आहे? पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत? सरकारी यंत्रणाही अपयशी का ठरतात? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना एनडीएचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरुन जानकर नाराज असल्याचे बोलले जाते. आता विरोधी पक्षांच्या आघाडीसोबत जाणार का? यासंदर्भात लेट्सअप मराठीशी साधलेला संवाद…
पुण्यातील कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. दोघेही मागील दीड वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड आहेत. मात्र पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विकास विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर अनेक खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. जाणून घ्या अदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास.