महाराष्ट्रात राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न? चंद्रकांतदादांनी स्पष्ट सांगितलं
Chandrakant Patil : महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवणार आहेत की नाही, याबाबत माहित नाही पण भाजप नेहमीच नव्या पिढीचा शोध घेत असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अद्याप सरकार स्थापन झालं नाही. महायुतीतून नेमका मुख्यमंत्री कोण होईल? याबाबत स्पष्टता नाही, तसेच राज्यात राजस्थान आणि मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवणार का? अशी चर्चा रंगली होती. त्यावर चंद्रकांत पाटील बोलत होते.
भाजपाचा मोठा निर्णय! विनोद तावडेंना ‘या’ राज्यांची जबाबदारी; महाराष्ट्रासाठी नवं नाव..
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप नेहमीच नव्या पिढीचा शोध घेत असते. प्रत्येक राज्यात एक तृतीयांश तिकीट हे नव्या उमेदवारांना देण्यात यावेत अशी धारण असते. नवीन पिढी समोर आली पाहिजे, हे भाजपचं उद्दिष्ट आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशसारखा प्रयोग राज्यात करणार आहेत की नाही मला माहिती नाही. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याला जेवढं कळतं तेवढंच तो करतो, त्या विचाराच्या भानगडीतही तो पडत नाही आम्ही त्या मनस्थितीत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
विरोधकांकडून ईव्हिएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, जे आम्ही भाषणात मुद्दे मांडले ते मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने निकालात मांडले. जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ईव्हिएम नसतो आता ईव्हिएम काढता, या शब्दांत याचिका फेटाळून लावलीयं, नूसती फेटाळली नाही तर टिप्पणीदेखील केली असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
चव्हाणांच्या विचारांची मला कीव येते, अमित देशमुखांनी घेतलं तोंडसुख…
शिंदेंनी मन मोठं केलंय त्याचं श्रेय मी घेतो…
राज्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय. भाजपला १३७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपलं मन मोठं करतील असं मी आवाहन केलं होतं. त्यानंतर शिंदेंनी मन मोठं केलं, मन मोठं करणे हे सोपं नाही. मी आवाहन केल्यानंतर शिंदेंनी मन मोठं केलं,त्याचं श्रेय मी घेत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी मिश्किलपणे स्पष्ट केलंय.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी यांनी देखील विविध तीर्थक्षेत्र स्थळी पूजा करत होत्या, त्याच प्रमाणेभाजप कार्यकर्ते देखील पूजा करून वेगवेगळ्या मागणी करीत आहेत. आता कोणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.